घरताज्या घडामोडीरशिया-यूक्रेन संकटात भारताच्या भूमिकेवरून थरुर यांचे मोठं विधान; म्हणाले...

रशिया-यूक्रेन संकटात भारताच्या भूमिकेवरून थरुर यांचे मोठं विधान; म्हणाले…

Subscribe

रशिया आणि यूक्रेनमध्ये मागील ४५ दिवसांपासून युद्ध सुरुच आहे. या युद्धादरम्यान नेहमीच भारताच्या भूमिकेवरुन चर्चा सुरु होती. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशि थरुर यांनी म्हटलं आहे की, यूक्रेन- रशिया संघर्षात भारताच्या राजनैतिक भूमिकेवर चर्चा करताना अतिशय आव्हानात्मक टप्प्यात आहोत. अनेक देशांसोबत असलेल्या हितसंबंधांमुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. यामुळे काही लहान चुकांचाही मोठा परिणाम होऊ शकतो.

काँग्रेस नेते शशि थरुर यांनी म्हटलं आहे की, भारत सध्या युक्रेन आणि रशियातील संघर्षात आपल्या भूमिकेवर चर्चा करण्यावरुन कठीण परिस्थितीमध्ये आहे. यामध्ये कोणता संशय नाही कारण पहिल्यांदाच भारत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यास तयार नव्हता. ज्यामुळे रशियाला त्रास होईल. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याकडे बचाव करण्यासाठी कारण असेल तसेच मला पूर्ण विश्वास आहे की, नवी दिल्लीत होणारी चर्चा मनोरंजक असेल.

- Advertisement -

संघर्षादरम्यान भारताच्या भूमिकेवर शशि थरुर म्हणाले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांमध्ये मतदानादरम्यान अनुपस्थिती असाताना आपल्या सिद्धांतांचा पुनरुच्चार करण्यास अधिक बोललो आहेत. आमच्या मुत्सद्देगिरीने त्या विविध हितसंबंधांचा विचार केला आहे. ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण क्वाडचे सदस्य आहोत त्यामुळे अमेरिकेने इंडो-पॅसिफिककडे दुर्लक्ष करून पूर्णपणे युरोपवर लक्ष केंद्रित करावे असे आम्हाला वाटत नाही, असे शशि थरुर म्हणाले आहेत.

छोट्या चुकीचे वाईट परिणाम होऊ शकतात

शशि थरुर यांनी पुढे म्हटलं आहे की, पहिल्या आठवड्यात युक्रेनमधून २३ हजार भारतीयांना बाहेर काढावे लागले. ज्यात बहुतांश विद्यार्थी सर्व हितसंबंधांमुळे आपण एक कठीण परिस्थितीमध्ये आहोत. यामुळे लाहन चुकांचेही गंभीर परिणाम होऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा : काश्मिरी पंडितांचा मारेकरी बिट्टाविरोधात 31 वर्षांनंतर चालणार खटला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -