घरदेश-विदेशचार विमानतळे असलेले केरळ बनले पहिले राज्य

चार विमानतळे असलेले केरळ बनले पहिले राज्य

Subscribe

केरळ राज्यात कुन्नूर विमानतळाचे उदघाटन आज करण्यात आले. या उदघानटानंतर आता केरळ राज्यात एकूण चार विमानतळ झाली आहेत.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज केरळ येथील कुन्नूर विमानतळाचे उदघाटन केले आहे. यावेळी त्यांच्या बरोबर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. एकाच राज्यात चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे. कुन्नूर विमानतळ हे २ हजार एकर परिसरात पसरले आहे. याला उभारण्यासाठी १८०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या विमानतळावर २ हजार प्रवाशी राहू शकतात. या विमानतळाच्या रनवेची लांबी ३ हजार ५० मीटर आहे नंतर ४ हजार मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे. कुन्नूर विमानतळापूर्वी केरळ राज्यात तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोड हे विमानतळ आहेत.

- Advertisement -

कार्यकर्त्यांनी केला विरोध

विमानतळाच्याय उदघाटनावरून वाद निर्माण झाला होता. भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या विमानतळाला विरोध केला. शबरीमला मंदिरावरून वाद सुरु असल्यामुळे हा विरोध करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते ओमान चंडी यांना निमंत्रण न दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे उदघाटनाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अबूधाबीसाठी विमान रवाना

या विमानतळावरून अबूधाबीकडे जाणारे विमान उडवण्यात आले. या विमानात १८० प्रवासी होते. विशेष पाहूण्यांनी झेंडा दाखवल्यानंतर या विमानाचे उड्डाण करण्यात आले. कुन्नूर विमानतळावरून उडवली जाणारी विमाने युएई, ओमान आणि कतार येथे जातील. तसेच या विमानतळाला हैद्राबाद, बंगळुरू आणि मुंबई पासूनही जोडले जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -