घरदेश-विदेशलग्नाच्या आदल्या दिवशी DIG च्या मुलीची आत्महत्या

लग्नाच्या आदल्या दिवशी DIG च्या मुलीची आत्महत्या

Subscribe

स्निग्धाचे एका डॉक्टरसोबत गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तिने कुटुंबियांना आपल्या प्रेमाबाबत सांगितले होते. मात्र तिच्या कुटुंबियांनी प्रेमाला नकार दिला.

बिहारची राजधानी पटनामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून या मुलीचे सोमवारी किशनगंडच्या जिल्हा दिंडाकाऱ्याशी लग्न होणार होते. स्निग्ना असे माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीचे नाव आहे. स्निग्धा पेशाने डॉक्टर होती. लग्नाच्या आदल्या दिवशी स्निग्धाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

१४ व्या मजल्यावरुन मारली उडी

माजी पोलीस महासंचालकांचे नाव सुधांशु कुमार असे सांगितल जात आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या उदयगिरी अपार्टमेंटमध्ये राहत होते. हे अपार्टमेंट पटनाच्या म्यूजियमसमोर आहे. सुधांशु कुमार यांची मुलगी स्निग्धाने रविवारी सकाळी अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान स्निग्धा आज सकाळीच तिच्या ड्राइव्हरसोबत अपार्टमेंटमध्ये आली होती. घटनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -

घटनास्थळावरुन मोबाईल जप्त

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. लग्नाच्या एक दिवस स्निग्धाने आत्महत्या केल्यामुळे हे प्रेमप्रकरण असल्याचे बोलले जात आहे. पटणाचे एसएसपी मनु महाराज यांनी सांगितले की, या घटनेचा वेगवेगळ्या बाजूने तपास केला जात आहे. अपार्टमेंटच्या टेरेसवरुन एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांकडून सुधांशु कुमार यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.

आत्महत्येसाठी स्टूलाचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, स्निग्धा पटनाच्या पटेलनगरमध्ये राहत होती. रविवारी सकाळी उदयगिरी अपार्टमेंटवरुन उडी मारण्याआधी ती आपल्या कारमधून स्टूल घेऊन आली होती. टेरेसवर असणाऱ्या खुर्चीवर स्टूल ठेवून तिने उडी मारुन आत्महत्या केली. याआधी देखील स्निग्धाने आत्महत्या करण्यासाठी पटनाच्या काही इमारतींची रेकी केली होती.

- Advertisement -

सोबत शिकणाऱ्या मुलांसोबत होते प्रेमसंबंध

स्निग्धाने एमडीचे शिक्षण पूर्ण केले होते. आता ती कोलकत्तामध्ये पीडीचे शिक्षण घेत होती. इथेच शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टरसोबत तिचे गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तिने कुटुंबियांना आपल्या प्रेमाबाबत सांगितले होते. मात्र तिच्या कुटुंबियांनी प्रेमाला नकार दिला. स्निग्धाचे लग्न जिल्हा दिंडाकाऱ्याशी ठरले होते. शनिवारी स्निग्धाचा साखरपुडा झाला होता आणि सोमवारी लग्न होणार होते. लग्नसोहळ्यासाठी बिहारचे अनेक मोठे मान्यवर आले होते.

हेही वाचा – 

२० वर्षाच्या तरूणाची लोकलसमोर आत्महत्या, व्हिडीओ आला समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -