घरदेश-विदेशबसमध्ये हस्तमैथून करणारा जेरबंद!

बसमध्ये हस्तमैथून करणारा जेरबंद!

Subscribe

दिल्लीमध्ये महिलांवर लैंगिक आत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातच दिल्लीच्या पोलिसांनी विद्यापीठातील एका तरुणीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला अटक केली होती.

दिल्लीमध्ये महिलांवर लैंगिक आत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातच दिल्लीच्या पोलिसांनी विद्यापीठातील एका तरुणीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला अटक केली होती. आता पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या डिटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेसमोर एक व्यक्ती हस्तमैथून करत होता. महिलेच्या तक्रारीवरुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा – दिल्लीत मुलीसमोर हस्तमैथून आणि…..

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

दिल्लीची डिटीसी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. ही बस ‘एम्स’च्या पुढे गेल्यावर आरोपीने सीटवर बसलेल्या महिलेसमोर आपली पॅंटची चैन उघडली. त्यानंतर त्याने कुणाचीही पर्वा न करता हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यावर संतापलेल्या महिलेने इतर प्रवाशांच्या मदतीने चालकाला बस थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेने इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले. तिने पोलिसांना फोन करुन या सर्व प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत हा आरोपी पूर्व दिल्लीच्या गाजीपूरचा रहिवाशी असून त्याचा नाव किशन दत्त असे आहे. या आरोपीने त्यावेळी मद्य प्राषाण केले होते का, याच्या तपासणीसाठी रक्ताचे नमूने पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा – ट्रेनमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -