घरCORONA UPDATEकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करून मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.

काय म्हणाले येडियुरप्पा ट्वीटमध्ये

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो.

- Advertisement -

दरम्यान, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करत याबतची माहिती दिली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करून घ्यायला तसंच आयसोलेट व्हायला सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Sushant Sucide Case : पाटण्यातील पोलीस अधीक्षकांना पालिकेने केले क्वॉरंटाईन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -