घरदेश-विदेशलेडी गागाने ट्विट केला संस्कृतचा असा श्लोक की, नेटकरीच संभ्रमात

लेडी गागाने ट्विट केला संस्कृतचा असा श्लोक की, नेटकरीच संभ्रमात

Subscribe

हे ट्विट पाहून बरेच लोक संभ्रमात देखील पडले तरी लोकांनी दिला प्रतिसाद

हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक असे ट्विट केले की, सोशल मीडियावर चर्चेला उधाणच आलं. लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत मंत्र लिहून ट्विट केला. ‘लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु’ असा मंत्र शेअर केल्यानंतर लोक याचा अर्थ आणि या मॅसेज करण्यामागचे कारण शोधायला लागले आहेत.

जर तुम्हालाही या मंत्राचा अर्थ माहित नसेल तर ‘लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु’ याचा अर्थ असा आहे की, या लोकप्रिय संस्कृत मंत्रातील काही शब्द आहेत, जे जगात प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी आहेत. म्हणजेच जगातील सर्वत्र, सर्व लोक आनंदी आणि स्वतंत्र असले पाहिजेत आणि माझ्या आयुष्यातील विचार, शब्द आणि कृती त्या आनंदात आणि त्या स्वातंत्र्यात काही तरी योगदान असावे.

असे केले गागाने ट्विट

- Advertisement -

असा आहे संपुर्ण मंत्र

स्वस्तिप्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः।

- Advertisement -

गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

संभ्रमात असूनही लोकांचे प्रत्युत्तर 

लेडी गागाने ट्विट केलेल्या या मंत्रानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लोकांना हे ट्विट आवडले असून ११ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी हे रीट्वीट देखील केले आहे. हे ट्विट पाहून बरेच लोक संभ्रमात देखील पडले, मात्र असे असताना ही अनेकांनी त्यांचे स्वागत केले आणि आनंदही व्यक्त केला. लेडी गागाच्या या ट्विटला सर्व प्रकारचे लोक प्रत्युत्तर देतांना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -