घरदेश-विदेशलिफ्टमध्ये अडकून ९ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत

लिफ्टमध्ये अडकून ९ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत

Subscribe

हैदराबादच्या हस्तिनापूरम येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका नऊ वर्षीय मुलीचा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकून मृत्यू झाला. हस्तिनापूरम येथील नॉर्थ एक्स्टेन्शन कॉलनीमध्ये लास्या यादव ही आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. या कॉलनीमध्ये त्यांचे तीन मजल्याचे घर आहे. यादव कुटुंबिय काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी राहण्यास आले होते. आज दुपारी लास्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होती. मात्र लिफ्टच्या दरवाज्यात तिचा पाय अडकला. ती पाय बाहेर काढणार तेवढ्यातच तिसऱ्या मजल्यावरुन कुणीतरी लिफ्टचे बटण दाबले आणि पाय बाहेर काढण्यापुर्वीच लिफ्ट सुरु झाली. लिफ्ट वर जात असताना त्यात अडकून लास्याचा दुर्दैवी अंत झाला.

या घटनेनंतर लास्याचे वडील चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि लिफ्ट मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. लिफ्टच्या कर्मचाऱ्यांना लास्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास लागले. लिफ्टमधून बाहेर काढल्यानंतर लास्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी ती आधीच मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

- Advertisement -

आंध्र प्रदेशचे बालहक्क संघटनेचे अध्यक्ष पी. अच्युत राव यांनी लास्याच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केले. तसेच लिफ्टची सेवा देणाऱ्या कंपनीवर सुरक्षेच्या दृष्टीने मानदंड न पाळल्याचा आरोप केला. तसेच बिल्डर जोपर्यंत सुरक्षेच्या बाबतीतले नियम पाळत नाहीत. तोपर्यंत महानगरपालिकेने त्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -