घरदेश-विदेशबँक खाते उघडण्यात भारताबाहेरील महिला आघाडीवर

बँक खाते उघडण्यात भारताबाहेरील महिला आघाडीवर

Subscribe

आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांहून कमी नाहीत. शिक्षण, राजकारण आणि इतर क्षेत्रात देखील महिला आघाडीवर असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे आता बँक खाते उघडण्यात देखील महिला आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. जागतिक बँक ग्लोबल फिंडेक्सच्या अहवालानुसार पुरुषांपेक्षा महिलांची अधिक बँक खाती असल्याचे समोर आले आहे.

या ६ देशात महिलांची बँक खाती अधिक

जगातील सर्वात जास्त बँक खाती कोणाची आहेत, हे जाणून घेण्यासाठी १४० देशांमधील बँकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये अर्जेंटिना, जॉर्जिया, इंडोनेशिया, लाओस, मंगोलिया आणि फिलिपिन्स अशा ६ देशात पुरुषांपेक्षा महिलांची बँक खाती अधिक असल्याचे उघड झाले आहे. आजकालच्या महिला नोकरी, व्यवसाय अधिक करत असल्याने महिलांची बँक खाती अधिक असल्याचे समोर अाले आहे. बँकेच्या ग्लोबल फिंडेक्स अहवालानुसार बचत खाते, व्याज खाते आणि वेतन खाते अशी विविध खाती महिला उघडत असल्याचे समोर आले. त्याचबरोबर २०११ सालापासून ते आतापर्यंत ७ टक्के महिलांच्या बँक खात्यात वाढ झाली आहे. २०११ साली ६५ टक्के महिलांची बँक खाती होती तर त्यात आता वाढ झाली असून महिलांच्या बँक खात्याची टक्केवारी ७२ टक्के झाली आहे.

- Advertisement -

भारतात मात्र पुरुषांची बँक खाती जास्त

भारतात मात्र उलट चित्र दिसत आहे. ग्लोबल फिंडेक्सच्या अहवालानुसार भारतातील महिलांच्या बँक खात्यापेक्षा पुरुषांची अधिक खाती असल्याचे उघड झाले आहे. भारतात पुरुषांची बँक खाती ८३ टक्के असून महिलांची ७७ टक्के बँक खाती असल्याचे अहवालातून समोर आले आहे. २०१४ पासून महिलांच्या बँक खात्यांमध्ये ६ टक्क्यांने वाढ झाली आहे.

आजकालच्या महिला मोठ्या संख्येने नोकरी आणि व्यवसाय करतात. त्यामुळे महिलांचे पगार हे बँक खात्यात जमा केले जातात. तर काही महिलांना पगार रोखीच्या स्वरुपात दिला जातो. यापैकी ४३ टक्के महिलांना तर २४ टक्के पुरुषांना रोखीने पगार दिला जात असल्याचे समोर आले असल्याची माहिती फिलिपिन्सचे डॉ. क्लॅपर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -