घरदेश-विदेशनरकात असल्याप्रमाणे अठरा वर्ष जगलो

नरकात असल्याप्रमाणे अठरा वर्ष जगलो

Subscribe

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या मलिकेतील अँकर सुहैब इलियासी याला जामीन मिळाल्यानंतर त्याने प्रसार माध्यमांसमोर दुःख व्यक्त केले.

गुन्ह्यांवर आधारीत मालिका ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा अँकर सुहैब इलियासी याला दिल्ली हायकोर्टाने दोषमुक्त केले आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी कनिष्ठ कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे जीवनातील १८ वर्षे वाया गेली असल्याचे इलियासी याने सांगितले. न्यायालाच्या निर्णयामुळे आपण खूप दुःखी असून ते १८ वर्ष आपल्यासाठी नरकासारखे होते. १८ वर्षापूर्वी इलियासीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मागील अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा इलयासी लढत होते. अखेर त्यांना न्यायालयाने दोषमुक्त केले. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढाईत आपल्याला यश मिळाल्याचे समाधान आहे मात्र त्यासाठी जीवनातील १८ वर्षे वाया गेली आहेत.

काय आहे प्रकरण

जानेवारी २००० मध्ये सुहेब इलियासीची पत्नी अंजूचा मृत्यू झाला होता. सुहेब आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. त्यामुळे सुहेबविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनात तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून इलियासीला अटक केले. २००४ मध्ये इलियासी विरोधात खूनाचा खटला सुरु झाला. इलियासी गैरमार्गावर असल्याचा संक्षय त्याच्य पत्नीला होता. त्यामुळे त्याला सोडून ती कॅनडा येथे स्थायिक होऊ इच्छित होती. या कारणावरुन पत्नीचा खून केला असल्याचा संक्षय पोलिसांना होता. दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने २०१७ मध्ये या प्रकरणी इलियासीला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र आपण निर्दोष असल्याचे सांगत या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. इलियासी विरोधात कोणताही पुरावा नसल्यामुळे हायकोर्टाने त्याला दोषमुक्त केले.

काय म्हणाला सुहैब

“मला दोषमुक्त करण्यात आले याचा मला विश्वास होत नाही. तिहाड कारगृह हे आता माझे घर राहिले नाही मी माझी मुलगी आलिया बरोबर राहातो. स्वातंत्र्याचा विचार तुरूंगात असताना नेहेमी करत होतो. मागील १८ वर्षांपासून मी निर्दोष असल्याचे सांगत होतो. आता न्यायालयानेही त्याला मान्यता दिली आहे. माझ्या जीवनातील १८ वर्षे मी गमावली. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी न्यायालय आणि देवाचे मी आभार मानतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -