घरमहाराष्ट्रआजी, माजी आमदारांना एसटीचा प्रवास मोफत

आजी, माजी आमदारांना एसटीचा प्रवास मोफत

Subscribe

महाराष्ट्राचे आजी - माजी आमदार आता एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून करणार मोफत प्रवास

महाराष्ट्राचे आजी, माजी आमदार आता एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करणार आहेत. या आमदारांना त्यांच्या पत्नीसह किंवा एका सहकाऱ्यासह एस. टी. महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे.

का घेण्यात आला हा निर्णय?

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या व्यक्ती विधान परिषदेत किंवा विधानसभेत निवडून आले आहेत अशा सर्वच आजी आणि माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी किंवा सहकाऱ्यासह एस.टी. च्या कोणत्याही प्रकारच्या बसमधून महाराष्ट्र आणि आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधानमंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. त्यासोबतच जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आजी किंवा माजी विधिमंडळ सदस्यांनी सर्व सामान्यांचे हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एस.टी मधून प्रवास केल्यास त्यातून सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत देखील पोहचेल. त्यासोबतच यातून असुरक्षित, अवैध आणि खासगी वाहतुकीऐवजी सुरक्षित धावणाऱ्या एस.टी.चा पर्याय जास्तीत जास्त लोकांना स्विकारण्याची प्रेरणा देखील मिळेल. याकरता आजी आणि माजी आमदारांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

या बसमधून मिळणार मोफत प्रवास

एसटीच्या सर्वच्या प्रकारच्या बसमधून आजी-माजी आमदारांना मोफत प्रवास करता येणार आहे. यामध्ये अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी आणि परिवर्तन या बसचा समावेश होत आहे. या बसमधून आता आजी आणि माजी आमदार मोफत प्रवास करु शकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -