घरदेश-विदेशGaurav Vallabh Resigns: काँग्रेस दिशाहीन झाली आहे... का म्हणाले गौरव वल्लभ असं?

Gaurav Vallabh Resigns: काँग्रेस दिशाहीन झाली आहे… का म्हणाले गौरव वल्लभ असं?

Subscribe

काँग्रेस दिशाहीन झाली आहे, गौरव वल्लभ यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. संधी बघून अनेकजण पक्षांतर करत आहेत. त्यातही काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला अनेकजण सोडचिठ्ठी देत आहेत. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. आता गौरव वल्लभ यांनी आज राजीनामा दिला आहे. (Lok Sabha 2024 Gaurav Vallabh Resigns Congress has become directionless Why did Gaurav Vallabh say this)

काँग्रेस नेते आणि प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण देखील सांगितले. काँग्रेस दिशाहीन झाल्याने राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. पक्षाचा सामान्यांशी, कार्यकर्त्यांशी कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. मी भावनिक आहे. पण आज माझं मन व्यथित आहे. मला खूप काही सांगायचे, लिहायचे आहे. परंतु माझी मूल्ये मला इतरांना दुखावतील असे काहीही बोलण्यास मनाई करतात. तरीही, आज मी माझे मत तुमच्यासमोर मांडत आहे, कारण मला वाटते की सत्य लपवणे हा देखील गुन्हा आहे आणि मला या गुन्ह्याचा भाग व्हायचे नाही.

‘मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले. काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. येथे तरुण, बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात माझ्या लक्षात आले की पक्षाचे सध्याचे स्वरूप तरुणांना नव्या कल्पनांसह सामावून घेण्यास सक्षम नाही. पक्षाचा ग्राऊंड लेव्हल वर संपर्क तुटला आहे. नव्या भारताच्या अपेक्षा तुम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे ना पक्ष सत्तेत येऊ शकला आहे ना विरोधी भूमिका ठामपणे पार पाडत आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निराश करत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले. पक्षाची वाटचाल दिशाहीन आहे. एकीकडे आपण जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा विरोध करत आहोत. या कार्यशैलीमुळे पक्षाच्या लोकांमध्ये विशिष्ट धर्माचे समर्थक असल्याची प्रतिमा निर्माण होते, असे वल्लभ यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

काँग्रसने रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वत:ला दूर ठेवले, यावर देखील गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्षाच्या या भूमिकेने मला अस्वस्थ केले. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्ष गप्प बसतो. एक प्रकारे, मौन संमती देण्यासारखे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -