घरदेश-विदेशLok Sabha 2024: भ्रष्टाचारविरोधातील लढाई थांबणार नाही; EDचे फक्त 3 टक्के खटले...

Lok Sabha 2024: भ्रष्टाचारविरोधातील लढाई थांबणार नाही; EDचे फक्त 3 टक्के खटले राजकारण्यांवर- मोदी

Subscribe

पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीत भाजपा ऐतिहासिक विजय नोंदवेल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या 10 वर्षांत त्यांच्या सरकारच्या कामगिरीपैकी, पंतप्रधानांनी विकास, सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या कामांची यादी वाचली.

नवी दिल्ली: भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावर झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशातील जनतेवर होतो. भ्रष्टाचार संपवणे हे आपले प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विरोधकांवर होत असलेल्या ईडी कारवाईच्या आरोपांवर पंतप्रधान म्हणाले की, केवळ तीन टक्के ईडी प्रकरणे राजकारणाशी संबंधित लोकांवर सुरू आहेत. (Lok Sabha Election 2024 PM Modi latest Interview in Marathi says fight against Corruption will continue)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीत भाजपा ऐतिहासिक विजय नोंदवेल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या 10 वर्षांत त्यांच्या सरकारच्या कामगिरीपैकी, पंतप्रधानांनी विकास, सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या कामांची यादी वाचली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे आणि राम मंदिर उभारणीच्या यशाचाही उल्लेख केला.

- Advertisement -

‘भ्रष्टाचार खपवून घेणार नाही’

पंतप्रधान म्हणाले की, ‘गेल्या 10 वर्षांत त्यांच्या सरकारचे प्राधान्य भ्रष्टाचार संपवणे हे आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावर असो, देशातील जनतेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत देशातील जनतेच्या हितासाठी पैसा चोरणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

फक्त तीन टक्के प्रकरणे राजकारण्यांशी संबंधित

पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. यावर पंतप्रधानांनी आरोप फेटाळून लावले आणि ईडीच्या केवळ तीन टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान म्हणाले, ‘भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही कारवाई केली जात आहे. आरोप तेच लोक करत आहेत ज्यांना स्वतःच्या विरोधात चौकशीची भीती वाटते. 2014 मध्ये आमचे सरकार स्थापन होताच आम्ही भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. तसंच, सरकारी सेवा शक्य तितक्या पारदर्शक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

10 वर्षांत 1 लाख कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या फायद्यांची गणना करताना, म्हणजे थेट लोकांच्या बँक खात्यात पैसे पाठवणे, पंतप्रधान मोदी म्हणाले की ‘DBT मुळे 10 कोटींहून अधिक बनावट लाभार्थी काढून टाकण्यात सरकारला यश आलं आहे. यातून सरकारने 2 लाख 75 हजार रुपये वाचवले आहेत, जे चुकीच्या हातात जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘2014 पूर्वी ईडीने 5,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. गेल्या 10 वर्षांत ईडीने जप्त केलेली रक्कम 1 लाख कोटींहून अधिक झाली आहे. 2014 पूर्वी ईडीने 34 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती, तर आमच्या सरकारमध्ये 2200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. विचार करा, हा पैसा गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला असता, तर किती लोकांना त्याचा फायदा झाला असता. तरुणांसाठी किती संधी निर्माण करता आल्या असत्या. पायाभूत सुविधांचे किती नवीन प्रकल्प सुरू करता आले असते.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदींची कधीच ख्याती नव्हती, ठाकरे गटाची बोचरी टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -