घरदेश-विदेशLok Sabha Election 2024: PM मोदींनी बजावला मतदानाचा हक्क; जनतेला आरोग्याची काळजी...

Lok Sabha Election 2024: PM मोदींनी बजावला मतदानाचा हक्क; जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर आज मतदान होत आहे. यामध्ये गुजरातमधील 25, उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्रातील 11 आणि कर्नाटकातील 14 जागांचा समावेश आहे.

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर आज मतदान होत आहे. यामध्ये गुजरातमधील 25, उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्रातील 11 आणि कर्नाटकातील 14 जागांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर मुलांसोबत मस्तीही केली. त्यांनी मुलांना आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना आपल्या मिठीतही घेतलं. मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर पीएम मोदींनी मीडियाशी संवादही साधला. (Lok Sabha Election 2024 PM Narendra Modi exercise right to vote Appeal to the public to take care of health)

यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदी म्हणाले, “दिवस-रात्र धावणाऱ्या या लोकांनी आपल्या तब्येतीचीही काळजी करावी. मीडियामध्ये स्पर्धा इतकी आहे की, तुम्हाला वेळेच्या पुढे धावावे लागेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि अधिक पाणी प्या यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची ऊर्जादेखील टिकेल.

- Advertisement -

लोकांना मताधिकाराचा वापर करण्याची विनंती

पंतप्रधान मोदींनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे. मी विशेषत: देशवासियांना विनंती करेन की, लोकशाहीत मतदान करणे हे साधे दान नाही. आपल्या देशात दानधर्माचे खूप महत्त्व आहे. त्याच भावनेने देशवासीयांनी मतदान करावे. आज तिसऱ्या टप्प्यात आणखी तीन आठवडे मतदान सुरू राहील.

पीएम मोदी मध्य प्रदेशला होणार रवाना

कालच आंध्र प्रदेशातून आलो असल्याचं पीएम मोदींनी सांगितलं. आज ते मध्य प्रदेशात जाणार आहेत. ते म्हणाले, “मी कालच आंध्र प्रदेशातून आलो आहे. इथून मला मध्य प्रदेशात जायचे आहे. मला महाराष्ट्रात जायचे आहे आणि त्यानंतर मला पुढे जायचे आहे. त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही.

- Advertisement -

जगाला शिकण्याची संधी 

पीएम मोदी म्हणाले की, ही जगासाठी शिकण्याची संधी आहे. जगातील विद्यापीठांनी यावर केस स्टडी करायला हवी. ते पुढे म्हणाले, “या वर्षी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात लोकशाहीचा उत्सव आहे. यासाठी निवडणूक आयोग अभिनंदनास पात्र आहे. माध्यमेही निवडणुकीच्या रंगात पूर्णपणे रंगून जातात. निवडणूक लोकशाही बळकट करते. लोकशाहीच्या या उत्सवात जो कोणी हातभार लावत आहे, त्यांचे आभार. हा लोकशाहीचा सण आहे, असंही मोदी म्हणाले.

महिलेने बांधली राखी

मीडियाशी बोलल्यानंतर, पीएम मोदींनी तिथे उपस्थित लोकांचीही भेट घेतली. यावेळी एका महिलेने त्यांना राखीही बांधली. यावेळी उपस्थित मुलांच्या तळहातावर पंतप्रधान मोदींनी त्यांचा ऑटोग्राफही दिला.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : मोदी यांचे हे कृत्य हिंदू संस्कृतीत बसत नाही, ठाकरे गटाचा हल्लाबोल)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -