घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: जे बोलाल ते विचार करून बोला; थोरातांचा राऊतांना सल्ला

Lok Sabha 2024: जे बोलाल ते विचार करून बोला; थोरातांचा राऊतांना सल्ला

Subscribe

आघाडीतील मित्रपक्षांबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचार करून बोलावं, मित्र पक्षातील नेत्यांचं मन दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

मुंबई: काही जागांसाठी आमचा आग्रह आहे. आम्ही सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेसाठी आग्रही आहोत. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. यावर आजच निर्णय होईल. तसंच आघाडीतील मित्रपक्षांबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचार करून बोलावं, मित्र पक्षातील नेत्यांची मनं दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राऊतांना दिला आहे. उद्या, 9 एप्रिलला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Congress leader Balasaheb Thorat gave advise to Thackeray group MP Sanjay Raut)

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीत तर काही जागांवरुन बिघाडी झाल्याचेच दृश्य आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर काँग्रेस आग्रही आहे. मात्र, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी त्या जागांवर आपले उमेदवार घोषित केल्याने आघाडीत वादाची ठिगणी पडली आहे. त्यातच सांगलीतून आग्रही असलेले काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. थोरातांनी पत्रकारांशी संवाद साधताना, ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांना विचार करून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

सांगलीचा निर्णय आजच होणार- थोरात (Thorat on Sangli Seat)

सांगलीच्या जागेबाबत दिल्लीत आमचे श्रेष्ठी बसतील आणि आज या जागेसह अन्य दोन जागा, भिवंडी आणि मुंबई याबाबतही निर्णय घेतला जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. तसंच, सांगलीच्या जागेबाबत आजच निर्णय होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

थोरात म्हणाले की, राऊत ज्या पद्धतीने मित्रपक्षांतील कार्यकर्त्यांबाबत वक्तव्य करत आहेत, ते योग्य नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. आघाडी आहे एकत्र काम करायचं आहे त्यामुळे राऊतांनी काळजीपूर्वक बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला. तसंच,  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मविआ पत्रकार परिषद घेत जागावाटपांबाबत निर्णय सांगेल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha : महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत बिघाडी; संजय राऊत स्पष्टच बोलले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -