घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान;...

Lok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान; लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

Subscribe

नवी दिल्ली : देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी पार पडेल. देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (ता. 16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तर आता या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबईत पाचव्या टप्प्यांत म्हणजेच 20 मे 2024 ला मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024 : Voting in 7 phases in the country, while in Maharashtra in 5 phases)

हेही वाचा… Election Commission : एकूण 97 कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क, 1.8 कोटी नवे मतदार 

- Advertisement -

महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे.  महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 16 जून 2024 ला भारताच्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात असे होईल मतदान…

पहिला टप्पा (19 एप्रिल 2024) :
नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर

- Advertisement -

दुसरा टप्पा (26 एप्रिल 2024) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी

तिसरा टप्पा (07 मे 2024) :
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा (13 मे 2024) :
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा (20 मे 2024)
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -