घरदेश-विदेशElection Commission : एकूण 97 कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क, 1.8 कोटी...

Election Commission : एकूण 97 कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क, 1.8 कोटी नवे मतदार

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, आमची टीम पूर्णपणे निवडणुकीसाठी तयार आहे. 2024 हे भारतात निवडणुकीचे वर्ष आहे. भारतातील लोकशाहीच्या या सणाकडे सर्वांचे लक्ष असते. पण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका घेणे, हे आमच्यासाठी आव्हान आहे. 16 जूनला भारताच्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. तर, जम्मू काश्मिर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. (Election Commission: A total of 97 crore citizens will exercise their right to vote, 1.8 crore new voters)

हेही वाचा… PM Narendra Modi : विकसित भारतासाठी तुमची साथ हवी, सूचना करा; पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना खुले पत्र

- Advertisement -

तसेच, देशात 97 कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत. देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी असून देशभरात साडेदहा लाख पोलिंग बूथ आहेत, असल्याची माहिची निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून देण्यात आली आहे. तर, 55 लाखांपेक्षा अधिक EVM निवडणुकीसाठी तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांची माहिती देताना सांगितले की, देशभराच तरुण मतदार 1.82 कोटी असून ते पहिल्यांदा मत देणार आहेत. यामध्ये 18 ते 29 वयाचे मतदार हे साडे एकवीस लाख आहेत. 82 लाखापेक्षा अधिक मतदार हे 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. तर, यंदा 48 हजार तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 47.1 कोटी महिला मतदार आहेत. तर, 12 राज्यांमध्ये पुरुपांपेक्षा महिला मतदारांचे अधिक प्रमाण असून देशभरात 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणे देखील सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या Appवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळवता येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, कुठे पैसे वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -