घरदेश-विदेशLoksabha Election 2024 : BJPला मात देण्यासाठी काँग्रेस 23 वर्षांपूर्वीची रणनीती राबविण्याच्या...

Loksabha Election 2024 : BJPला मात देण्यासाठी काँग्रेस 23 वर्षांपूर्वीची रणनीती राबविण्याच्या तयारीत!

Subscribe

2014 मध्ये भाजप सत्तेत येण्याआधी देशात काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार दहा वर्ष होतं. तेव्हा 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येण्याआधी काँग्रेसने 2001 मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात रणनीती आखली होती. ती रणनीती 2004 मध्ये कामा पडून तिचे सत्तेत रुपांतर झालं होतं.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीविरुद्ध भाजप प्रणित एनडीएच असा सामना रंगण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी सत्तेत असलेल्या भाजपला रोखणं हे एक आव्हानच असल्याने आता काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी तब्बल 23 वर्षांपूर्वीची रणनीती राबविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या रणनीतीचा कसा आणि किती फायदा होतो हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होणारच आहे. (Loksabha Election 2024 Congress preparing to implement 23 years old strategy to defeat BJP)

2014 मध्ये भाजप सत्तेत येण्याआधी देशात काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार दहा वर्ष होतं. तेव्हा 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येण्याआधी काँग्रेसने 2001 मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात रणनीती आखली होती. ती रणनीती 2004 मध्ये कामा पडून तिचे सत्तेत रुपांतर झालं होतं, मात्र, 2014 मध्ये भाजपने काँग्रेसची दहा वर्षाची सत्ता उलथून सत्ता काबीज केली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेस भाजपला मात देण्यासाठी रणनीती आखत असून तीसुद्धा 2001 मधील असल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा या रणनीतीचा कसा आणि किती फायदा होतो हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Buldhana Farmer : शेतकऱ्याचा रुद्रावतार; बाजार समितीत हातात कोयता अन् गावठी कट्टा घेऊन राडा

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आली होती रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. यामध्ये काँग्रेस मागे नसून, आगामी निवडणुकीत कसे यश मिळवता येईल याबाबत रणनीती आखल्या जात आहे. त्यासाठी काँग्रेसने आगामी निवडणूक आणि भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी 2001 मध्ये राबविण्यात आलेल्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 2001 मध्ये राबविण्यात आलेली रणनीतीमध्ये सोनिया गांधी यांचा सिंहाचा वाटा होता हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : श्रीराम मांसाहारी प्रकरण : Jitendra Awhad यांच्या अडचणी वाढणार? भाजपाने केला पुण्यात गुन्हा दाखल

2019 च्या तुलनेत काँग्रेसची भूमिका अशीही बदलली

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची जी भूमिका होती ती आता काहीसी बदलत असल्याचे चित्र आहे. सध्या काँग्रेस मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याची काही उदहारणं समोर आली असून, कारण काँग्रेसने पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ 255 जागांवर समाधान मानण्याची तयारी दर्शविल्याचेही समोर आले आहे. 2019 मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या 421 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये पक्षाला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या. आता 2019 पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -