घरक्राइमतृणमूल नेत्याच्या घरावर छापा टाकायला गेलेल्या ED च्या पथकावर जीवघेणा हल्ला; अनेक...

तृणमूल नेत्याच्या घरावर छापा टाकायला गेलेल्या ED च्या पथकावर जीवघेणा हल्ला; अनेक जखमी

Subscribe

कोलकाता : रेशन घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात केंद्रीय एजन्सी ईडीने आज (5 जानेवारी) सकाळी कोलकाता आणि त्याच्या लगतच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकूण 12 ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. मात्र यावेळी तृणमूल नेते आणि ब्लॉक अध्यक्ष शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या ईडीच्या पथकावर त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. (Fatal attack on ED team raiding Trinamool leader house Many injured)

शाहजहान शेख यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. अनेकांची डोकी फुटली आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढवा लागला. सध्या जखमी अधिकाऱ्यांना स्थानिक कॅनिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी ईडी पथकासोबत असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Joginder Sharma : टी-20 वर्ल्डकप विजेत्या गोलंदाजावर गुन्हा दाखल; तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहान शेख यांच्या समर्थकांनी ईडीच्या पथकावर अचानक हल्ला केला, ज्या त्यांना जराही अंदाज नव्हता. तसेच अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना स्वत:चे संरक्षणही करता आले नाही. शेख यांच्या समर्थकांनी भीतीपोटी ठिकठिकाणी लपलेल्या अधिकाऱ्यांना शोधून मारहाण केली. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा त्यांनी निषेध केला. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

- Advertisement -

लोकशाहीत तोडफोड थांबवणे हे सुसंस्कृत सरकारचे कर्तव्य

ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस म्हणाले की, “ही एक भयंकर, चिंताजनक आणि खेदजनक घटना आहे. लोकशाहीत विटंबणा आणि तोडफोड थांबवणे हे सुसंस्कृत सरकारचे कर्तव्य आहे. जर सरकार आपल्या मूलभूत कर्तव्यात अपयशी ठरले, तर राज्यघटना भारत आपला मार्ग स्वीकारेल. योग्य कारवाईसाठी मी माझे सर्व घटनात्मक पर्याय राखून ठेवले आहेत. या निवडणुकीपूर्वीच्या हिंसाचाराचा लवकर अंत झाला पाहिजे आणि ही त्या शेवटाची सुरुवात असायला हवी.”

हेही वाचा – Blood Bank : “रक्त विकण्यासाठी नाही…,” रक्तपेढ्या आता फक्त प्रक्रिया शुल्क आकारणार; DCGI च्या सूचना

रोहिंग्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवली

ईडीच्या हल्ल्यानंतर पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांत मजुमदार म्हणाले की, शाहजनहान शेख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ईडी कारवाई करत राहील, हे पूर्णपणे स्पष्ट आहे. परंतु संदेशखळी येथे ईडीवर झालेल्या हल्ल्यामुळे हे स्पष्ट झाले की, रोहिंग्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. तर भाजपाचे माजी अध्यक्ष राहुल सिन्हा म्हणाले की, शाहजहान शेख हा संदेशखळी भागातील डॉन आहेत. त्यांच्यावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहे. मात्र ते टीएमसीचे नेते असल्याने पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -