घरमहाराष्ट्रनागपूरBuldhana Farmer : शेतकऱ्याचा रुद्रावतार; बाजार समितीत हातात कोयता अन् गावठी कट्टा घेऊन राडा

Buldhana Farmer : शेतकऱ्याचा रुद्रावतार; बाजार समितीत हातात कोयता अन् गावठी कट्टा घेऊन राडा

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक खळबळजनक घटना घडली. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला कमी भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांने रुद्रावतार धारण केला. हातात कोयता आणि पिस्टल घेत त्याने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बुलढाणा : विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाला नैसर्गिक संकटातून वाचवून शेतकऱ्यांनी बाजार समितीत विकायला आणल्यानंतर त्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे एका शेतकऱ्यांने चक्क बाजार समिती आवारात हातात कोयता आणि पिस्ट घेत राडा केला. हा सगळा प्रकार आज शुक्रवारी (5 जानेवारी) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घडला. यामुळे शेतकऱ्याचा बांध फुटल्याचे दिसून आले. (Buldhana Farmer Rudravatar of the farmer Rada with koyta and gavathi katta in hand in market committee)

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक खळबळजनक घटना घडली. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला कमी भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांने रुद्रावतार धारण केला. हातात कोयता आणि पिस्टल घेत त्याने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील शेतकरी रवींद्र महानकर यांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणली होती. मात्र सोयाबिनला कमी दर मिळाल्याने महानकर संतापले. बाजार समितीच्या बाहेर त्यांनी उघड्यावर सोयाबीन टाकले, हातात कोयता आणि पिस्टल घेत त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती.

हेही वाचा : Fadnavis On Rohit Pawar : रोहित पवारांवरील ईडी कारवाईबाबत फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisement -

लागवडीचा खर्चही निघाला नाही

झालेल्या प्रकारानंतर शेतकरी रवींद्र महानकर यांनी मीडियासमोर येत त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी मूळ अकोला जिल्ह्यातील असून, खामगाव बाजार समितीत तरी योग्य दर मिळेल या आशेवर खामगावला सोयाबीन घेऊन आलो होते. मात्र येथील भाव मिळालाच नाही. शंभर क्विंटल सोयाबीन विकली, पण खर्च भरून निघेल इतकाही भाव मिळाला नाही अशी प्रतिक्रिया महानगर यांनी माध्यमांना दिला.

हेही वाचा : सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील जनतेला न्याय द्यावा, Vijay Wadettiwar यांची मागणी

त्या शेतकऱ्याकडील शस्त्र जप्त

खामगार कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या या प्रकारानंतर खामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत शेतकऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेतकऱ्याकडील शस्त्रे जप्त केली. शेतकऱ्याच्या हातात दिसत असलेली पिस्टल सदृश्य वस्तू एअर गन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -