घरदेश-विदेशभारतातील घरगुती गॅस सिलिंडर जगात स्वस्त; जाणून घ्या जगभरातील देशांमधील दर

भारतातील घरगुती गॅस सिलिंडर जगात स्वस्त; जाणून घ्या जगभरातील देशांमधील दर

Subscribe

भारतातील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ही जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी संसदेत यासंदर्भातील माहिती जाहीर केली. त्यानुसार, देशात वाढत्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तेल कंपन्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला 14.2 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली आहे. किमतीत वाढ झाल्याने दिल्लीत एलपीजीची किंमत 1,053 रुपयांवर पोहचली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी सोमवारी सांगितले की, भारतातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमधील वाढ ही जागतिक स्तराच्या तुलनेत सर्वात कमी आहे. दरम्यान इनपुट खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह सात देशांतील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींची तुलना केली,

- Advertisement -

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींवर बोलताना म्हटले की, देशात इंधनाच्या किमती वेगवेगळ्या जाहीर करु शकत नाही. तसेच जागतिक बाजारपेठेत काय सुरु हे पाहणे देखील महत्त्वाचे असते. याशिवाय कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठीतील किंमतींवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पुरी यांनी पुढे म्हटले की, केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमती जवळपास 200 रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे केंद्र इंधनाच्या किंमती स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरल्याचे दिसतेय. पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती या केंद्र सरकारच्या निर्धारित तंत्राद्वारे ठरवल्या जातात.

या देशातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती

भारत- 1,053 रुपये (दिल्ली)

- Advertisement -

पाकिस्तान- 1,113.73 रुपये

नेपाळ- 1,139.93 रुपये

श्रीलंका- 1,343.32 रुपये

यूएस- 1,754.26 रुपये

ऑस्ट्रेलिया- 1,764.67 रुपये

कॅनडा- 2,411.20 रुपये

दरम्यान देशात एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतील 6 जुलै रोजी शेवटची वाढ करण्यात आली होती. या किंमत वाढीमुळे दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 1,053 रुपये, मुंबईत 1,052.50 रुपये, कोलकत्तामध्ये 1,079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये झाली आहे.


हेही वाचा: सडलेली पानं झडलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -