घरताज्या घडामोडीराहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक

Subscribe

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीतील विजय चौकात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Rahul Gandhi Detained by Delhi police)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी सुरू आहे. याआधी राहुल गांधी यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तेव्हाही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देशभर निषेध व्यक्त केला होता. आताही, सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असताना काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी दिल्लीतील विजय चौकात निदर्शन करत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस प्रवक्त्यांकडून भाजपवर निशाणा

नेमकं काय घडलं?

- Advertisement -

सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडी चौकशी लावल्याने राहुल गांधी यांना राष्ट्रपतींना भेटून निवेदन द्यायचे होते. त्यासाठी ते जात असताना त्यांना विजय चौकात अडवण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांनी विजय चौकातच धरणे आंदोलन पुकारले. या सर्व प्रकारामुळे राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधील नेत्यांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यामध्ये अनेक खासदारही होते. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक खासदारांनाही ताब्यात घेतले.


चर्चा करत नाहीत पण अटक करतात

राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की बेरोजगारी ते महागाई यासह इतर अनेक मुद्द्यांवर आम्हाला बोलायचे आहे. पण पोलीस आम्हाला येथे बसू देत नाही. तर, दुसरीकडे संसदेत चर्चाही होऊ देत नाहीत. आणि पोलीस आम्हाला इथे अटक करतात.


हेही वाचा – केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येणार नाही; ममतांचा भाजपला इशारा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -