घरदेश-विदेशMadhya Pradesh : मिशनरी स्कूलवर ८ मुलांच्या धर्मांतरणाचे आरोप, शाळेवर दगडफेक

Madhya Pradesh : मिशनरी स्कूलवर ८ मुलांच्या धर्मांतरणाचे आरोप, शाळेवर दगडफेक

Subscribe

विद्यार्थ्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप मध्य प्रदेशातील मिशनरी स्कूलवर करण्यात आला आहे. या आरोपानंतर मिशनरी स्कूलच्या परीक्षेदरम्यान काही हिंदू संघटनांनी शाळेवर तुफान दगडफेड करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशतातील विदिशा गंज बासौदा येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे.

सोमवारी सेंट जोसेफ स्कूलमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होती. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शाळेवर धर्मांतरणाचे आरोप करत हल्ला केला. तसेच संतप्त आंदोलकांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या धर्मांतरणाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. शाळेने या आरोपांनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या या धर्मांतरणाच्या मुद्यावरून विहिंप आणि बजरंग दलाने शाळेला घेराव घालत तुफान राडा केला. यावेळी काही संतप्त आंदोलकांनी शाळेचे गेट तोडून आणि भिंतीवर चढून शाळेच्या आवारात घुसखोरी केली. तसेच तेथे उभ्या असलेल्या कार आणि शाळेच्या वर्गांच्या खिडक्यांची तोडफोड केली, तसेच शाळेवर तुफान दगडफेक केली. या सर्व घटनेदरम्यान विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होती. परीक्षा असल्याने शाळेच्या आवारात ४ पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र आंदोलकांची संख्या पाहता पोलिसांनी त्यांना अटकाव करणे अशक्य होते. यानंतर पोलिसांची मोठी तुकडी घटनास्थळी पाचारण करण्यात आली. यावर एसपी मोनिका शुक्ला यांनी सांगितले की, योग्यती कारवाई केली जाईल, परंतु याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.

३० ऑक्टोबरला एका ख्रिस्ती धर्माच्या कार्यक्रमात गोपनीयरित्या ८ मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे आरोप विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. ख्रिस्ती धर्मियांकडून धर्मांतरणाचे हे राज्यातील चौथे प्रकरण आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला. ज्यात काही मुलांवर पाणी शिंपडून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले, असे आरोप केले जात आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -