घरताज्या घडामोडीVitamin Deficiency : शरीरात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते विस्मरण ; जाणून...

Vitamin Deficiency : शरीरात ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते विस्मरण ; जाणून घ्या उपाय

Subscribe

जीवनभर निरोगी राहण्यासाठी आपले शरीर सुदृढ राहणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य तो आहार घेणे तितकेच आवश्यक आहे. व्हिटॅमिनच्या अभावामुळे अनेक आजारांचा विळख्यात अडकू शकतो. ज्याप्रमाणे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन A,B,C आणि D आवश्यक आहे त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जर या व्हिटॅमिन प्रमाण आपल्या शरीरात योग्य असेल तर, तुम्ही कधीही आजारी पडू शकत नाही.

व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे विस्मरण, हाड दुखण्याची समस्या याशिवाय संपूर्ण मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होऊन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्यातही त्रास होतो. त्यामुळे व्हिटॅमिन बी-१२ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन बी-१२ असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश नाही केलात तर अनेक आजाराच्या समस्या उद्भवू शकतात. काही वाईट जीवाणू, प्रतिजैविक, शस्त्रक्रिया आणि टेपवार्म्स देखील व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता निर्माण करू शकतात.

- Advertisement -

व्हिटॅमिन बी-१२ च्या अभावामुळे होणारे परिणाम

  • वारंवार मूड बदलणे
  • तणाव निर्माण होतो
  • खूप थकवा येणे
  • चक्कर येणे
  • भूक नसणे
  • वजन कमी होणे
  • हाता-पायांना मुंग्या येणे
  • जलद हृदयाचा ठोका
  • स्नायूंची कमजोरी

व्हिटॅमिन बी-१२च्या अभावामुळे नर्वस सिस्टम डॅमेज होते.महिलांच्या प्रसूतीच्या वेळी या व्हिटॅमिन-बी-१२ची आवश्यकता भासते.त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केल्यावर व्हिटॅमिन-बी-१२ चे प्रमाण वाढवू शकता.

व्हिटॅमिन बी-१२ साठी ‘या’ पदार्थाचे करा सेवन

  • अंडी
  • सोयाबीन
  • दही
  • पनीर
  • ओट्स
  • दूध ब्रोकली
  • मशरूम
  • मासे

हे ही वाचा – लसीकरणाचं किमान वय १५ वर्ष करा; आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -