घरदेश-विदेशशिवसेना नेते रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या; त्यांची पत्नी व मुलगाही...

शिवसेना नेते रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या; त्यांची पत्नी व मुलगाही जखमी

Subscribe

मध्य प्रदेशमधील शिवसेनेचे माजी प्रदेश प्रमुख रमेश साहू यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी आणि मुलगा हेदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. रमेश साहू यांच्यावर गोळ्या झाडून आरोपी तिथून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस आरोपींचा तसाप घेत आहेत. ही घटना इंदौर येथील उमरी खेडा गावात घडली. रमेश साहू उमरी खेडातील साई राम ढाब्यावर उपस्थित होते. यावेळी अज्ञातांनी येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी मधे आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून कोणतेही सामान अथवा पैसे चोरीला गेले नसल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींनी केवळ हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे यातून स्पष्ट होते. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रमेश साहू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तब्बल १० वर्ष रमेश साहू हे मध्य प्रदेशमध्ये शिवसेनेचे प्रदेश प्रमुख राहिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील चाचण्या तातडीने वाढवा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -