घरदेश-विदेश२८ नोव्हेंबरला मुंबईत शेतकर्‍यांची महापंचायत

२८ नोव्हेंबरला मुंबईत शेतकर्‍यांची महापंचायत

Subscribe

मुंबईतील आझाद मैदानावर येत्या २८ नोव्हेंबरला शेतकर्‍यांची महापंचायत होणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाकडून देण्यात आली आहे. तसेच येत्या २९ नोव्हेंबरपासून रोज ५०० शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये भरून शांततेने संसदेजवळ आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी येथे दिली.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटना २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधातील शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असताना शेतकरी संघटनांच्या संयुक्त मोर्चाने आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली. मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत केंद्र सरकारला घेरणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

- Advertisement -

सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात संसदेजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत. येत्या २९ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा २९ नोव्हेंबरपासून रोज ५०० शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये भरून शांततेने संसदेजवळ आंदोलन करणार आहेत.

पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि यूपीमधील शेतकरी २६ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने दिल्ली सीमेवर पोहोचतील आणि सभांमध्ये सहभागी होतील. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकर्‍यांची महापंचायत होणार आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाकडून देण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळीही प्रशासनाच्या परवानगीने शेतकर्‍यांनी जंतर-मंतरवर निदर्शने केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -