घरदेश-विदेशLive Update: रायगड दंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणेंचा जामीन मंजूर

Live Update: रायगड दंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणेंचा जामीन मंजूर

Subscribe

पोलिसांकडून नारायण राणेंच्या कोठडीची मागणी


नारायण राणेंच्या जामीनाबाबत काही क्षणात निर्णय

- Advertisement -

महाड पोलिसांनी नारायण राणेंना न्यायालयात आणलं


राणेंच्या अटक कारवाईचा खटला महाड येथील कोर्टात चालणार

- Advertisement -

काही क्षणांत राणेंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाणार आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर नारायण राणेंचा खटला चालवला जाणार आहे. अॅड अनिकेत उज्वल निकम, अॅड भाऊ साळुखे नारायण राणे यांची बाजू मांडणार आहे.


नारायण राणे महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल, महाड पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्ते दाखल


उद्या नारायण राणेंना न्यायलयात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार


महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक


पोलीस राणेंना घेऊन महाडच्या दिशेने रवाना झाले असून महाड कोर्टात राणेंना हजर करण्यात येणार आहे.


राज्यात आज ११९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आज ४,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४३,०३४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


नारायण राणेंना आज दिलासा देण्यात हायकोर्टाचा नकार देण्यात आला आहे. रितसर याचिका दाखल करुन उद्या सकाळी सुनावणीसाठी प्रयत्न करणार असे सांगण्यात येत आहे.


राणे काहीही चुकीचे वागले नाहीत, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मी राणेंना सांगितले आहे की पक्ष तुमच्या पाठीशी आहे,असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


नारायण राणे महाड पोलिसांच्या ताब्यात. रत्नागिरी पोलिसांनी महाड पोलिसांकडे नारायण राणेंचा ताबा सोपावला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक सचिन जौजांळेकडे नारायण राणे यांचा ताबा देण्यात आला आहे.


नारायण राणेंना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला – भाजप


राणेंना पोलिसांकडून धक्काबूक्की करण्यात आली असून ते जेवत असताना त्यांचे ताट हिसाकावून घेण्यात आल्याचा आरोप भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा स्थगित, आता यात्रेचे परिवर्तन आंदोलनात होणार- प्रमोद जठार, संगमेश्वरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, नारायण राणेंना रक्तदाबालाचा त्रास सुरु झाल्याने केले रुग्णालयात दाखल, नारायण राणेंच मानसिक संतुलन बिघडलेलं- गुलाबराव पाटील


नारायण राणेंनी जणाची नाही तर मनाची लाज बाळगावी, केंद्रीय मंत्री पदाची राजीनामा द्यावा- शिवसेना खासदार विनायक राऊत


राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता, राणेंच्या बीपी आणि शुगरमध्ये वाढ, नितेश राणे, निलेश राणे नारायण राणेंसोबत, पोलिसांनी नारायण राणेंना रत्नागिरी पोलीसांनी घेतलं ताब्यात


नारायण राणेंना ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरु, नाशिक पोलीस राणेंना कोर्टात हजर करणार, नारायण राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरु, संगमेश्वरमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, पोलिसांची दुसरी तुकडी गोळवलीमध्ये दाखल, नारायण राणेंविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार, त्यामुळे नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, संगमेश्वर पोलिसांकडे नारायण राणेंना अटक करण्यासंदर्भात कोणतेही वॉरंट नाही, आमच्यावर खूप दबाव असल्याची पोलिसांची माहिती,


नारायण राणेंचा अटकपूर्व अर्ज रत्नागिरी कोर्टाने फेटाळला, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक संगमेश्वरमध्ये दाखल, पोलीस अधीक्षक घेणार नारायण राणेंची भेट, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची हायकोर्टात धाव


वरुण देसाई आम्ही घरात नसताना आले, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक कायदा हातात घेत आहेत- नितेश राणे


राज्यात जे काही सुरु आहेत ते चुकीचे आहे- राज ठाकरे


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, नारायण राणेंच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला, बोलण्याच्या भरात नारायण राणे बोलले असतील, राणेंच्या वक्तव्याच्या पाठीशी भाजपा नाही, कायद्याच्या भाषेत राणेंचे वक्तव्य दखलपात्र गुन्हा होत नाही. सरकारने बस म्हटल्यावर काही लोक लोटांगण घालत आहेत, महाविकास आघाडी सरकार पोलीसजीवी सरकार झाले आहे, नाशिक पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, भाजपा थांबलेलं नाही आणि थांबणारही नाही, राणेंना अटक झाली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही-  देवेंद्र फडणवीस


नारायण राणेंविरोधात रोहित कदम नावाच्या व्यक्तीने पुणे पोलिसांत केली तक्रार


काही दिवसांनी शिवसेना सत्तेवर नसेल- नारायण राणे, नारायण राणेंच्या संगमेश्वरमधील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तणावाचे वातावरण


नाशिकमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन


नारायण राणेंच वक्तव्य निषेधार्ह आहे, अशी भाषा राजकारणात कुणी वापरली नाही, राणेंच वक्तव्य मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचा अपमान करणारे- जयंत पाटील


रत्नागिरीच्या सीमेवर नितेश राणे यांनी पोलिसांनी अडवले, सिंधुदुर्गातून चिपळूनमध्ये ते जात होते, पोलिसांकडे कसलेही आदेश नसताना त्यांनी मला जबरदस्ती अडवून ठेवले आहे असे भाजपा नेते नितेश राणे यावेळी सांगितले.


जुहूतील भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत ८ युवासेना कार्यकर्ते जखमी


विधानसभा विरोधीपक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज दुपारी १.०० वाजता सागर बंगला येथे होणार आहे. तसेच आज दुपारी १२.०० वाजता प्रदेश कार्यालयात भाजपा मुख्य प्रवक्ते मा. केशव उपाध्ये यांची होणारी पत्रकार परिषद होणार नाही.


पुण्यात युवासेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक सुरु


मुंबईतील जुहूमध्ये शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, भाजपाने दगडफेक सुरु केली- वरुण सरदेसाई, नारायण राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केली दगडफेक,भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत पोलीस जखमी, जुहूमध्ये नितेश राणेंचा फोटो असणाऱ्या गाडीची शिवसेना कार्यकर्त्यांकडून तोडफोट


थोड्यावेळात शिवसेनेची ताकद दिसले, आत्ताची भाजपा खरंच वाजपेयींची भाजपा आहे का? – युवासेना सचिव वरुण सरदेसाई, मुंबईतील जुहूमधील युवासेना कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, कार्यकर्त्यांकडून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री पदाचे भान ठेऊन बोलायला पाहिजे होते असे शिवसेना कार्यकर्त्यांचे मत, पोलिसांकडून युवासेना कार्यकर्त्यांची अडवणूक सुरु, जुहूमध्ये शिवसेना- भाजपा कार्यकर्ते आमने-सामने, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, दोन्ही बाजूने दगडफेक सुरु,


राणेंच्या वक्तव्यावरून चिपळूण, औरंगाबाद, नाशिकसह मुंबईत शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर, चिपळूणमध्ये आक्रमक शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड सुरु


राणेंच आता वय झालं आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, ज्यापद्धतीने ते बेताल वक्तव्य करतात ही निश्चितचं महाराष्ट्राती संस्कृती नाही- दादा भुसे


नारायण राणेंच्या मुंबई जुहू येथील बंगल्याबाहेर शिवसैनिकांचे आंदोलन, बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, जुहूमध्ये शिवसेना कार्यकर्ते जमायला सुरुवात


चिपळूणमध्ये शिवसेना- भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, शिवसेनेकडून नारायण राणेंचा जाहीर निषेध, बहादूर शेख नाका परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात, औरंगाबमधील क्रांती चौकात शिवसेनेकडून आंदोलन सुरु, नारायण राणेंच्या पोस्टरवर औरंगाबादेत ‘जोडे मारो’ आंदोलन


आपण कायदेशीर बाबी पाळत आहोत, कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरु- नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे


कायद्यानुसार केंद्रीय मंत्र्यांला अटक करु शकत नाही, नारायण राणेंची ती बोलण्याची शैली, बॉल आपटला की तो उसळी मारुन वर येणारचं- चंद्रकांत पाटील


मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही, दगडफेक करणे याच पुरुषार्थ नाही, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही, माझी बदनामी झाली तर मी सर्वात आधी गुन्हा दाखल करेन, मी शिवसैनिकांना भीक घालत नाही, उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात तेव्हा गुन्हे दाखल होत नाही, कानशिलात लगावणे असं बोलणं हा गुन्हा नाही? नारायण राणे शिवसेनेतून गेले तेव्हाचं शिवसेना गेली, आदेश काढणारे पोलीस आयुक्त पंतप्रधान आहेत का? मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सवाबद्दल माहिती नाही हा देशद्रोह- नारायण राणे


नारायण राणेंची भाजपा कार्यक्रमाला हजेरी, अटक टाळण्यासाठी नारायण राणे कायदेशीर सल्ला घेणार, औरंगाबादमध्येही राणेंविरोधात तक्रार दाखल होणार, नाशिकमध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक, अटक टाळण्यासाठी नारायण राणे मुंबई उच्च न्यायालयात जाणार


महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र  महाड, नाशिकनंतर आता पुण्यात नारायण राणेंवर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर

राणे यांना अटक करण्यासाठी पुणे शहर पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नारायण राणेंना अटक करण्य़ासाठी नाशिक पोलीसांचं एक पथक चिपळूनला पोहचलं,  नितेश राणे कणकवलीहून चिपळूनला निघणार, राणेंना अटक करण्य़ासाठी पुणे पोलिसही चिपळूनकडे रवाना


नारायण राणेंच्या अटकेपूर्वी चिपळूणमध्ये तणावाचे वातावरण, नारायण राणेंना अटक करुन कोर्टात हजर करण्याचे आदेश, नारायण राणे थोड्याचवेळात नियोजित दौऱ्यासाठी रवाना होणार, नाशिक पोलीस चिपळूणला रवाना


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बँनर लावून त्यावर “कोंबडी चोर !!!” असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहीलेत. त्यामुळे मुंबईत वातावरण तणावपुर्ण झालंय. याचे पडसाद आणखीन तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्तं केली जातेय. नाशिक, पुणे नंतर मुंबईतही राणे विरुद्द शिवसेना तणाव वाढण्याची शक्यता

narayan rane controversial statement about cm uddhav thackeray
narayan rane controversial statement about cm uddhav thackeray

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. नारायण राणेंची घराबाहेरली सुरक्षा वाढवली, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा


ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

केंद्र सरकारने ओबीसींच्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३१ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाख केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ दिल्लीला रवाना झाले आहेत.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -