घरक्रीडाTokyo Paralympics : पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात तेक चंदने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात तेक चंदने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

Subscribe

पॅरालिम्पिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळाही प्रेक्षकांविनाच राष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला.

टोकियो पॅरालिम्पिकचा (Tokyo Paralympics) उद्घाटन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ऑलिम्पिकप्रमाणेच पॅरालिम्पिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळाही प्रेक्षकांविनाच राष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. जपानचे सम्राट नारुहितो यांनी उद्घाटन सोहळाची सुरुवात केली. यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती डग्लस एमहॉफ, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सन्स आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात जपानमधील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

मंगळवारी पार पडलेल्या पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात १६२ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सोहळ्यात मरियप्पन थंगावेलु भारतीय पथकाचे नेतृत्व करणार होता. मात्र, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या जवळून संपर्कात आल्याने त्याच्यासह सहा भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत तेक चंदने भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पथकाचे संचलन टीव्हीवर पाहतानाच त्यांना शुभेच्छा करतानाचे ट्विट केले.

- Advertisement -

अफगाणिस्तानचा झेंडा फडकला

भारताने यंदा पॅरालिम्पिकसाठी ५४ पॅरा-खेळाडूंचे पथक टोकियोला पाठवले आहे. भारताचे खेळाडू विविध अशा नऊ क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. यंदाच्या स्पर्धांत जगभरातील एकूण ४ हजार ४०३ खेळाडू विविध २२ खेळांमध्ये खेळणार आहेत. अफगाणिस्तानचे पथक टोकियोमध्ये दाखल झाले नसले, तरी एका स्वयंसेवकाने अफगाणिस्तानच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली.

- Advertisement -

हेही वाचा – सरावाला सुरुवात, पण अफगाण क्रिकेटपटूंमध्ये भीतीचे वातावरण


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -