घरदेश-विदेशMahashivratri 2022 : झारखंडच्या देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

Mahashivratri 2022 : झारखंडच्या देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

Subscribe

Deoghar Babadham Temple Stampede : देशभरात आज महाशिवरात्री सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील देवघर बाबाधाम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अनेक भाविक जखमी झाले आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी देवघरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होता. याचवेळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दर्शन काउंटरजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक महिला व पुरुष जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने महिनाभर केलेली व्यवस्था क्षणार्धात कोलमडली आहे. या घटनेदरम्यान बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांनीही जिल्हा प्रशासनानेला सहकार्य न केल्याचे आरोप केला आहे. मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच जखमी भाविकांची भेट घेत त्या याप्रकरणीची तक्रार करण्यासाठी एसडीओकडे गेल्या मात्र त्यांना आत प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. यावेळी अंबा प्रसाद यांनी भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने योग्य व्यवस्था न केल्याचं म्हणत निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

 


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -