घरताज्या घडामोडीmoney laundering case : नवाब मलिकांचा मुलगा फराज मलिकला ईडीचे समन्स, मनी...

money laundering case : नवाब मलिकांचा मुलगा फराज मलिकला ईडीचे समन्स, मनी लाँड्रिंगबाबत ED करणार चौकशी

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयाने आपल्याविरुद्ध नोंदवलेला मनी लॉड्रिंगचा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिकांनी हायकोर्टात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. यानंतर ईडीने नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. यानंतर आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिकांना संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यामध्ये आता नवाब मलिकांच्या कुटुंबातील सदस्यांना ईडीने समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिकांच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

नवाब मलिकांचा मुलगा फराज मलिकला ईडीने समन्स पाठवले आहे. गैरव्यहार, मनी लॉड्रिंगमध्ये फराज मलिक यांची चौकशी करण्यात येईल. या चौकशीसाठी फराज मलिक ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांची ईडीविरोधात हायकोर्टात धाव

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्याविरुद्ध नोंदवलेला मनी लॉड्रिंगचा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिकांनी हायकोर्टात केली आहे. दरम्यान अटक बेकायदेशीर असून ताबडतोब सोडण्यात यावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच नवाब मलिक ईडीच्या चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीतच

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -