घरदेश-विदेशदिल्ली : सीजीओ कॉम्पलेक्समध्ये भीषण आग; एका सुरक्षा दलाच्या निरीक्षकाचा मृत्यू

दिल्ली : सीजीओ कॉम्पलेक्समध्ये भीषण आग; एका सुरक्षा दलाच्या निरीक्षकाचा मृत्यू

Subscribe

दिल्लीतील सीजीओ कॉम्पलेक्समध्ये भीषण आग लागली असून या आगीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) निरीक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली येथील प्रगति विहारच्या सीजीओ कॉम्पलेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. पं. दीनदयाल अंत्योदय भवनाच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली असून या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग आटोक्यात आली आहे.

- Advertisement -

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही भीषण आग सीजीओ कॉम्पलेक्सच्या अकराव्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. मात्र या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पेपर कार्ड फॅक्टरीला आग

याआधी दिल्लीतील नारायणा इंडस्ट्रीयलमधील पेपर कार्ड फॅक्टरीला १४ फेब्रुवारीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. तसेच करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये १२ फेब्रुवारीला आग लागल्याचे समोर आले होते. या आगीमध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश होता. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किर्ती नगर परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि सामान जळून गेले होते.


वाचा – व्हेज अरोमालगत आग; स्थानिकांची धावपळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -