घरमहाराष्ट्रकोल्हापूरातील 'गोकुळ दूध' मुख्यालयात आयकर विभागाची धाड

कोल्हापूरातील ‘गोकुळ दूध’ मुख्यालयात आयकर विभागाची धाड

Subscribe

कोल्हापुरातील शिरगाव येथील प्रसिद्ध गोकुळ दूध महासंघाच्या मुख्यालयावर आयकर विभागाची धाड.

प्रसिद्ध गोकुळ दूध महासंघाच्या कोल्हापुरातील शिरगाव येथील मुख्यालयात आयकर विभागाकडून अचानक धाड टाकण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर आणि राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आयकर विभागाने गोकुळ दूध महासंघाची चार तास चौकशी केली असल्याचे समोर आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार; कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आयकर विभागाकडून मंगळवारी मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे. अचानक आयकर विभागाने धाड टाकल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गोकुळ दूध संघाची वार्षिक उलाढाल

मागील काही महिन्यांपासून गोकुळ दूध संघाकडून नेहमीपेक्षा कमी प्रमाणात कर भरणा झाला आहे. तसेच गोकुळ दूध संघाची २ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे ५ कोटी रुपयांचा कर गोकुळकरुन चुकवण्यात आल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दूध दरात घट

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर भरण्याविषयी गोकुळच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून गाईच्या दूध दरात घट झाली आहे. घट झाल्याने ९० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे कर भरण्यातही घट झाली आहे. मात्र, गोकुळच्या अधिकाऱ्यांचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दूध संघावर धाड टाकण्यात आली असून यासंबंधीचे कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून याविषयीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.


वाचा – उत्तर महाराष्ट्रात ‘आयकर’चे छापे; १८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली

- Advertisement -

वाचा – आयकर परताव्यासाठी आता १५ दिवसांची मुदत वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -