घरदेश-विदेशSupriya Sule : ममतादीदी आमच्याच सोबत - सुप्रिया सुळे

Supriya Sule : ममतादीदी आमच्याच सोबत – सुप्रिया सुळे

Subscribe

मुंबई : इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ममतादीदी या इंडिया आघाडीच्या अतिशय महत्त्वाच्या मार्गदर्शिका आणि सगळ्यांच्या प्रिय नेत्या आहेत. इंडिया आघाडीचा त्यांचा सीट शेरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे. पश्चिम बंगालमध्ये त्या वेगळा लढणार असल्या तरी त्यांचे जेवढे उमेदवार निवडून येतील ते India Alliance बरोबरच राहतील. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला पश्चिम बंगालची परिस्थिती मला माहिती नाही. महाराष्ट्रात  महागाई, बेरोजगारीचे मोठे आव्हान आहेत. महाराष्ट्राच्या समोर आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र सरकार मार्ग काढत नाही आहे. महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हान आहेत. मला पश्चिम बंगालची परिस्थिती माहिती नाही.

- Advertisement -

ममतादीदी आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत. आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्या पूर्ण ताकतीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील. संसदेमध्ये गेली 10 वर्ष आमच्याच बरोबर बसतात. त्याचप्रमाणे आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि या देशाची सेवा करू. आमच्यात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

पक्षा चिन्हाबदलही टिप्पणी

राष्ट्रवादीचा निकाल शिवसेनेसारखाच लागेल? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्ष आमचा आहे. शरद पवार 60 वर्षात 5 चिन्हांवर लढले. काय प्रोब्लेम आहे. अजित पवार गटाकडे पक्ष गेला तरी मी नाही घाबरत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -