घरदेश-विदेशबुलंदशहर हिंसाचार, पोलिसाला ठार करणारा अटकेत

बुलंदशहर हिंसाचार, पोलिसाला ठार करणारा अटकेत

Subscribe

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणामध्ये पोलिसांनी  कलुआ नामक व्यक्तिला अटक केली आहे. पोलिसांवर वार करून त्यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

बुलंदशहर हिंसाचारादरम्यान पोलिसावर हल्ला करून ठार करणाऱ्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. यावेळी सुबोध कुमार सिंग यांची डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. अखेर सोमवारी रात्री पोलिसांनी कलुआ नामक व्यक्तिला अटक केली आहे. कलुआनं सुबोध कुमार सिंग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार केले होते. तर प्रशांत नट या आरोपीनं गोळ्या झाडल्या होत्या. प्रशांत नटला २८ डिसेंबर रोजीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस आणखी एका आरोपीच्या शोधात होते. अखेर सोमवारी रात्री कलुआला बस स्टॅडवरून मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. गोहत्या झाल्याची अफवा पसरल्यानंतर बुलंदशहरामध्ये हिंसाचार झाला होता.

वाचा – बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

बुलंदशहरामध्ये हिंसाचार झाल्यानंतर ४०० जणांच्या जमावानं सुबोध कुमार सिंग यांच्यावर हल्ला केला होता. सुबोध कुमार सिंग यांच्यावर दगडानं हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर काठीनं देखील मारहाण करण्यात आली होती. यावेळी एका २० वर्षाच्या तरूणाचा देखील मृत्यू झाला होता. याप्रकरणी बजरंग दलाचा कार्यकर्ता प्रकाश राजला देखील पोलिसांनी अटक केली आहे. योगेश राज मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहे. बुलंदशहर हिंसाचार प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र मलिक या जवानाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र मलिक हा हिंसाचारावेळी त्याठिकाणी हजर होता. शिवाय, हिंसा करण्यासाठी जमावाला प्रवृत्त देखील करत होता. जितेंद्र मलिकला अटक केल्यानंतर त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – बुलंदशहर हिंसाचार; ‘धक्कादायक’ व्हिडीओ आला समोर

वाचा – बुलंदशहर हिंसाचार: जवानाचा पोलिसावर गोळीबार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -