घरदेश-विदेशवेट्रेसला मिळाली सात लाखांची टीप

वेट्रेसला मिळाली सात लाखांची टीप

Subscribe

हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाने दोन बॉटल पाणी मागवले. पाण्याचे पैसे देऊन वेट्रेसला दहा हजार डॉलर्स (सात लाख रुपये) ची टीप दिली.

हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला टीप देणे ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. अनेकदा टीप देतांना आपण काही नाणी किंवा थोडेसे रूपये वेटरला देतो. वेटरकडून मिळालेल्या सेवेसाठी ही टीप दिली जाते. टीप सामान्यतः हॉटेल्स, क्लब किंवा बारमध्ये बील भरतेवेळी देण्यात येते. काहीजण टीपला खर्चीक तर काहीजण सकारात्मक प्रभाव किंवा मैत्रीपूर्ण संबंधाना प्रोत्साहन देण्याचे साधन मानतात. मात्र फक्त पाण्याच्या दोन बाटल्या मागवण्याच्या मोबदल्यात १० हजार डॉलर्सची टीप मिळाल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅरोलिनातील सुप डॉग्स इन ग्रीनव्हिले या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. १० हजार डॉलर्सची टीप मिळवून या वेट्रेसेचा आनंद गगनात मावत नव्हता. सुरुवातीला या वेट्रेसलाही यावर विश्वास बसला नाही. तिने या रकमेतील मोठा वाटा स्वःताजवळ ठेवून बाकीचे पैसे इतर कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. हॉटेमध्ये बवलेल्या कॅमेऱ्यामध्ये याचे चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडिओ YouTube वर टाकण्यात आला आहे. आतापर्यंत ५० लाख लोकांचा त्याला प्रतिसाद आला आहे.

वेट्रेसने केला आनंद व्यक्त

“हॉटेलमध्ये आलेला ग्राहक फक्त काही वेळेसाठी आला होता. त्याने दोन बाटल्या पाण्याची मागणी केली. पाणी दिल्यावर टेबलावर रोख पैसे ठेवून तो निघून गेला. टीप टेबलावर ठेवल्याचे त्याने निघताना सांगितले. टेबलावरचे पैसे बघून अगोदर ही मसकरी असल्याचे मला वाटले. मात्र नंतर त्याने खरी टीप दिली असल्याचे नंतर समजले. १० हजार डॉलर ही एक मोठी रक्कम आहे. या रकमेमुळे मी खूप खूष आहे. अशा प्रकारचे ग्राहक मी पहिल्यांदाच बघितला.”- वेट्रेस अॅलेना कस्टर

- Advertisement -

“चांगले लोक चांगलीच कामे करतात. येवढी रक्कम टीपमध्ये देणारा पहिलाच व्यक्ती आम्ही पाहिला. हे पैसे तुम्हाला दुःखातून बाहेर येण्यासाठी मदत करु शकतात. जीवनात एकदाच अशा प्रकारचा आनंद मिळू शकतो.”- सुप डॉग्स इन ग्रीनव्हिले रेस्टॉरंटचे मालक ब्रेट ओलिव्हियो 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -