घरदेश-विदेशश्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कोतहर भागातील एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले आहे. श्रीनगरमधील कोतहर भागातील एका घरामध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर कारवाई करत दोनही दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक देखील उडाली. दरम्यान, सध्या या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं आहे. तर कारवाई दरम्यान शाळा, कॉलेज आणि इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. मागील चार दिवसांमध्ये जवळपास पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाईला आता लष्कराकडून देखील जशास तसे उत्तर दिले जात आहे. यापूर्वी राजौरी येथे झाेलल्या कारवाईमध्ये ७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. दहशतवाद्यांनी आणलेल्या स्फोटकांना स्पर्श केल्यानं स्फोट झाला ज्यामध्ये ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुला यांनी टिका केली होती. शिवाय स्थानिक संघटनानी काश्मीर बंदची हाक देखील दिली होती.

‘दहशतवाद थांबवा मगच चर्चा’

दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानशी चर्चा कशी होऊ शकते? दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा अशक्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असे मत मांडले. पाकिस्ताननं पहिल्यांदा दहशतवादी कारवाया थांबवाव्यात त्यानंतर चर्चा होईल असं पाकला ठणकावलं. दरम्यान, भारतानं पाकिस्तानशी चर्चेसाठी वेळोवेळी हात पुढे केला आहे. पण, पाकिस्ताननं मात्र कायम दहशतवादाला पोसलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात चर्चेसाठी हात पुढे केला होता. पण पाकिस्ताननं मात्र दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या. शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर भारताचा कायम भर राहिला आहे. त्यासाठी चर्चेची देखील तयारी आहे. पण, पाकिस्तान मात्र भारताविरोधात दहशतवादी करावाया करत आहे. अशा वेळी चर्चास कशी होणार? असा खडा सवाल देखील राजनाथ सिंह यांनी केला.

वाचा – दहशतवाद थांबल्यानंतर पाकशी चर्चा- राजनाथ सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -