घरदेश-विदेशविकृताने केला कुत्र्याच्या पिल्लांवर लैंगिक अत्याचार

विकृताने केला कुत्र्याच्या पिल्लांवर लैंगिक अत्याचार

Subscribe

एका विकृताने कुत्र्याच्या पिल्लांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे फोटो एका महिलेने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

एका विकृत व्यक्तीने कुत्र्यांच्या पिल्लांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चैन्नईत समोर आली आहे. एका महिलेने हा प्रकार बघितल्यानंतर याची तक्रार केली. या महिलेनी संबधीत पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान एका कुत्र्यांच्या सामाजिक संस्थेने हे फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केले आहेत. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून ही माहिती समोर आली आहे. तक्रार करणाऱ्या महिलेने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे.

- Advertisement -

कशी घडली घटना

तक्रारदार महिलेने दिलेल्या नुसार, आरोपीने कुत्र्याच्या पिल्लांना उचलून घेतले होते. कुत्र्यांच्या पिल्लांना आश्रय देत असल्याचे सुरुवातीला या महिलेला वाटले. मात्र अचनाक या आरोपीने पँटची चेन उघडली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार महिलेने स्थानिक पोलिसांना तक्रारीसोबत सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी दिली. मात्र या फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही यासाठी पोलिसांना आरोपी शोधण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -