घरमहाराष्ट्रजीवे मारण्याच्या भीतीपोटी तो गावठी कट्टा बाळगायचा

जीवे मारण्याच्या भीतीपोटी तो गावठी कट्टा बाळगायचा

Subscribe

जिवंत मारण्याच्या भीतीपोटी गावठी कट्टा आणि दोन काडतुसे बाळगणाऱ्या रिक्षा चालकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल संजय सोनकडे असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. तो पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालवण्याचे काम करतो. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा मिळाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल संजय सोनकडे हा रिक्षा चालक असून तो पिंपरी-चिंचवड शहरात उदरनिर्वाह करतो. त्याला पुण्यातील काही तरुणांनी मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी राहुल हा घाबरून होता, ते जीवे मारतील या भीतीने त्याने ७ हजार रुपयांना गावठी कट्टा विकत घेतला आणि तो बाळगला होता. वेळीच आरोपी राहुलला ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला, असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, भिसे, बोऱ्हाडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -