घरदेश-विदेशManipur Violence: 'त्या' अत्याचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आम्ही करू, सरन्यायाधीशांचा सरकारला इशारा

Manipur Violence: ‘त्या’ अत्याचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आम्ही करू, सरन्यायाधीशांचा सरकारला इशारा

Subscribe

मणिपूर मध्ये दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावर संताप व्यक्त केला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यावर प्रतिक्रिया देत असे म्हटले, मणिपुर मध्ये महिलांसोबत जे काही झाले ते पूर्णपणे वाईट आहे. सरकारने यावर तातडीने कारवाई करावी. जर सरकारने यावर कारवाई केली नाही तर आम्ही करु असा इशारा सरन्यायाधींनी सरकारला दिला आहे. (Manipur Violence)

सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की, सांप्रदायिक वादाच्या क्षेत्रात महिलांना एखाद्या वस्तूप्रमाणे वापर करणे संविधानाचे उल्लंघन केल्यासारखे आहे. घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अत्यंत लज्जास्पद आहे. सीजेआय चंद्रचूड, न्यायाशीध पीएम नरसिम्हा आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले, आम्ही सरकारला थोडा वेळ देत आहोत. जर काही कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करु.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारला निर्देशन दिले आहेत की, या घटनेबद्दल जी कारवाई केली जाईल त्याचे संपूर्ण अपडेट्स कोर्टाला द्यावे. मीडियात जे काही या घटनेबद्दल दाखवले जात आहे आणि या हिंसेदरम्यान महिलांचा वापर संविधानिक स्वातंत्र्यांच्या भावनांच्या विरोधातील आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या बद्दल वेळोवेळी अपडेट द्यावेत. सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील सुनावणी पुढील शुक्रवार पर्यंत टाळली आहे.

खरंतर मणिपूर सध्या दोन जातीमधील हिंसेमुळे चर्चेत आहे. मात्र आता व्हिडिओवरुन मणिपूरच्या डोंगराळ भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ 4 मे रोजीचा आहे. या व्हिडिओतील दोन महिला कुकी समुदायातील आहेत. तर पुरुषांचा जो ग्रुप आहे तो मैतई समुदायातील आहे. आदिवासी संघटना इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमने आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा- Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या विवस्र व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -