घरदेश-विदेशManipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या विवस्र व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या विवस्र व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Subscribe

मणिपूर मधील दोन महिलांसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली गेली आहे. या व्हिडिओ दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढली गेली. या व्हायरल व्हिडिओवर राजकीय नेते, कलाकार आणि देशभरातील लोकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत एका व्यक्तीला अटक केली आहे. (Manipur Violence)

आरोपीची ओळख खुरिएम हीरो दासच्या रुपात झाली आहे. व्हिडिओत पुरुषांच्या एका ग्रुपने दुसऱ्या समुदायातील दोन महिलांना निवस्र करुन त्यांची धिंड काढली. तर इंडिजीनियस ट्राइबल लीडर्स फोरमच्या गुरुवारी ठरलेल्या प्रस्तावित परेडआधी हा व्हिडिओ समोर आला आहे. तर सरकारने ट्विटरसह अन्य सोशल मीडियातून मणिपूरातील हिंसाचाराचा हा व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमच्या मते, ही घटना राज्यातील राजधानी इंफाल पासून जवळजवळ 35 किमी दूर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी झाली होती. दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढल्यानंतर शेतात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केले गेले. या प्रकरणी इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमच्या राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती.

या एकूणच घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, ही दुर्घटना अत्यंत लज्जास्पद आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल असे ही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

याचसोबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले, मी तो व्हिडिओ पाहिला असून हे अत्यंत दु:खद आहे. या प्रकरणी तातडीने पोलिसांना आरोपींना पकडण्याचे आदेश दिले असून राज्य सरकार त्यांना कठोर शिक्षा देईल असे ही त्यांनी म्हटले आहे.

मणिपूर मध्ये झालेल्या या हिंसाचारावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेवर भाष्य करत असे म्हटले की, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एफआयआर दाखल करुन 63 दिवस झाले तरीही अद्याप आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. ही घटना अमानवी आणि लज्जास्पद असल्याचे स्मृती इरानी यांनी म्हटले आहे.


हेही वाचा- अल्पवयीन मुलीला कामावर ठेवले, मारहाण केली; लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला दिला चोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -