घरदेश-विदेशमनोहर पर्रिकरांचा हा 'अवतार' तुम्ही पाहिलात का?

मनोहर पर्रिकरांचा हा ‘अवतार’ तुम्ही पाहिलात का?

Subscribe

रविवारी मनोहर पर्रिकरांना 'अवतार' पाहून सर्वांनाच धक्का बसला. रविवारी मनोहर पर्रिकर यांनी मांडवी नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीबद्दल सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर पर्रिकरांनी राजीनामा द्यावा. भाजप त्यांच्या जीवाशी खेळत आहे असा टीकेचा सूर देखील पाहायाला मिळाला. अगदी न्यायालयापर्यंत हे सारं प्रकरण गेलं. पण, रविवारी मनोहर पर्रिकरांचा ‘अवतार’ पाहून सर्वांनाच धक्का बसला. रविवारी मनोहर पर्रिकर यांनी मांडवी नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी काही अधिकारी देखील त्या ठिकाणी हजर होते. पण, त्यांचा हा ‘अवतार’ पाहून सर्वांना धक्का बसला. नाकात तोटी घातलेले आणि आता प्रकृतीत झालेली घसरण यामुळे मनोहर पर्रिकरांच्या तब्येतीबद्दल चर्चा अधिक रंगल्या. पण, या साऱ्या गोष्टींशिवाय चर्चा होती ती मनोहर पर्रिकरांनी दाखवलेल्या कर्तव्यतत्परतेमुळे. आजारी असताना देखील मनोहर पर्रिकर यांनी राज्यातील कामांचा आढावा घेतला. सध्या गोव्यासह सर्वत्र मनोहर पर्रिकरांच्या या ‘अवतारा’बद्दल चर्चा सुरू आहे. सध्या या ‘अवतारा’चे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायर झाले आहेत.

प्रकृतीमुळे मनोहर पर्रिकर घरीच

तब्येतीमध्ये बिघाड झाल्यानं मनोहर पर्रिकर सध्या घरातूनच राज्याचा कारभार पाहत आहेत. कन्सरवर त्यांच्यावर अमेरिकेमध्ये देखील उपचार झाले. शिवाय, दिल्लीतील एम्स देखील त्यांना दाखल करण्यात आले. त्यानंतर मुंबईत देखील त्यांच्यावर उपचार झाले. अखेर डॉक्टरांनी त्यांना गोव्यातील घरी हालवत त्यांच्यावर उपचार केले.सध्या मनोहर पर्रिकर गोव्यातील घरीच आहेत. पण, रविवारी त्यांनी मांडवी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या या अवताराबद्दल चर्चा सुरू झाली. यापूर्वी त्यांच्या घधरावर देखील मोर्चा काढण्यात आला होता. पण , पोलिसांनी हस्तक्षेप करत हा मोर्चा देखील रोखला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -