घरदेश-विदेशS. Jaishankar : अनेक मुस्लिम देश भारताशी मैत्री करू इच्छितात कारण..., जयशंकर...

S. Jaishankar : अनेक मुस्लिम देश भारताशी मैत्री करू इच्छितात कारण…, जयशंकर काय म्हणाले

Subscribe

काही देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असली तरी जगातील अनेक देश भारताशी मैत्री करू इच्छितात. यात इराण आणि सौदी अरेबियाचा देखील समावेश असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काही देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असली तरी जगातील अनेक देश भारताशी मैत्री करू इच्छितात. यात इराण आणि सौदी अरेबियाचा देखील समावेश असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. (many muslim countries want friendship with india foreign minister s jaishankar told the reason)

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ‘विश्व बंधू भारत’ या विषयावर ते बोलत होते. जगभरातील विविध देशांशी जुळवून घेण्याच्या भारताच्या क्षमतेविषयी यावेळी त्यांनी सांगितले. अमेरिका, युरोप, रशिया, आफ्रिकन देश, इस्राएल, खाडी तसेच अरब देशांसह अनेक देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi Masala Racket : दूध, तांदळानंतर आता मसाल्यातही भेसळ; दिल्लीत 15 टन बनावट मसाला जप्त

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरातील अनेक देशांमध्ये परस्पर विरोधाची भावना असताना, युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारत मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ यावरच भर देताना दिसतो आहे. तसेच आपल्या देशासाठी हिताचे निर्णय राबवण्यासाठी विविध पातळ्यांवर सर्व देशांशी सहकार्याच्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय हितांच्या संरक्षणासाठी विविध देशांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याची क्षमता असलेल्या देशाला ‘विश्व बंधू’ अशी संज्ञा देखील त्यांनी दिली. (many muslim countries want friendship with india foreign minister s jaishankar told the reason)

- Advertisement -

वैश्विक कनेक्टिव्हिटी वाढवणार

वैश्विक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते आहे, हे सांगताना जयशंकर यांनी सध्या विचाराधीन असलेल्या तीन योजनांचा उल्लेख केला. या अंतर्गत संयुक्त अरब अमिरातीच्या माध्यमातून भारत आणि युरोप जोडले जाणार आहे. इराण आणि रशियामधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उत्तर – दक्षिण कॉरिडॉर तयार करणे तसेच ओडिशा तट आणि पूर्वोत्तर भागाच्या माध्यमातून व्हिएतनाम आणि प्रशांत महासागर जोडले जाणार आहे. सौदी अरेबिया, इराण, रशिया, सिंगापूर, व्हिएतनाम यांसह अन्य देश भारताशी मैत्री करू इच्छितात. यामुळे गुंतवणूक, रोजगार आणि कनेक्टिव्हिटी वाढेल, असेही जयशंकर म्हणाले. (many muslim countries want friendship with india foreign minister s jaishankar told the reason)


 

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -