घरदेश-विदेशदेशाची सुरक्षा अजूनही वाऱ्यावर?

देशाची सुरक्षा अजूनही वाऱ्यावर?

Subscribe

इंटरनेट कॉलिंगवर नजर ठेवणं अशक्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय. यामुळे २६/११ च्या हल्लायनंतर देशाची सुरक्षा अजूनही वाऱ्यावर आहे का? असा प्रश्न उद्भवलाय.

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा हँगआउटसारख्या सोशल अॅपच्या माध्यमातून व्हॉईस कॉल करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. इंटरनेटची उत्तम सुविधा उपलब्ध असेल तर या प्रकारचे व्हॉईस कॉल अगदी सहज लावता येऊ शकतात. तुम्हीही अशाप्रकारे इंटरनेट कॉलिंग करता का? तर मग सावधान. कारण इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे कॉल आणि त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशांवर, आमचं नियंत्रण नसल्याचा मोठा खुलासा राज्य सरकारने केला आहे. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागचे मास्टर माईंड मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांशी ‘व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सर्व्हिस’ (VoIP) च्या माध्यमातून संपर्क साधत होते. त्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणांना त्याचा ट्रेस लावणं शक्य होत नव्हतं.

- Advertisement -

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत याविषयी माहिती देणारं एक लेखी पत्रक दिलं आहे. रिजीजू यांनी या म्हटलं आहे की, व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सर्व्हिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘कोडिंग-डिकोडिंग’च्या विशिष्ट प्रणालीमुळे हे कॉल्स ट्रेस करणं सुरक्षा यंत्रणांना सहज शक्य होत नाही. त्यामुळे या कॉल्सद्वारे दिल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या ‘सिक्रेट’ संदेशांचा ट्रॅक ठेवणं, आम्हाला शक्य होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान अशाप्रकारचे इंटरनेट कॉल सहज ट्रेस करता येतील अशी प्रणाली विकसीत केली जात असून लवकरच ती कार्यकत होईल, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -