घरमुंबईलोकलमध्ये विकृताचे महिलेकडे पाहून 'अश्लील' चाळे

लोकलमध्ये विकृताचे महिलेकडे पाहून ‘अश्लील’ चाळे

Subscribe

लोकलमधून प्रवास करत असताना एका महिलेकडे पाहून एका तरुणाने अश्लील चाळे केले. सीसीटीव्हीमध्ये हा विकृत ट्रेनमधून उतरताना दिसला असून आता पोलीस आता या विकृताचा शोध घेत आहे.

मुंबईतल्या लोकल प्रवासादरम्यान घडणाऱ्या विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईत असाच काहीसा प्रकार घडला आहे. लोकलमधून प्रवास करत असताना एका महिलेकडे पाहून एका तरुणाने अश्लील चाळे केले. सीसीटीव्हीमध्ये हा विकृत ट्रेनमधून उतरताना दिसला असून आता पोलीस आता या विकृताचा शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी २४ वर्षीय तरुणीने संध्याकाळी ७.३० वाजता मुंबईकडे जाणारी ट्रेन पनवेलहून पकडली. ट्रेन सुरु झाली इतक्यात एक तरुण या डब्यात शिरला. हा तरुण गडबडीत महिला डब्यात चढला असावा, असे तिला वाटले. म्हणून तिने त्याला हटकले नाही. पण खांदेश्ववर स्टेशन जवळ येताच त्याने पँटची चेन उघडून त्याने अश्लील चाळे केले. तिने त्याला हटकले. पण तरीदेखील तो थांबला नाही. त्या तरुणीने या विकृताचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने तिच्या हातातून फोन हिसकावला. तो ट्रेनमधून उतरला आणि त्याने तिचा फोन पुन्हा डब्यात फेकून दिला.

- Advertisement -

सीसीटीव्हीत कैद

विकृत तरुण महिला डब्ब्यातून उतरताना दिसत आहे. पण या विकृताचा चेहरा स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत. या आधी वाशीला देखील असाच प्रकार घडला होता. त्यावेळी विकृताला पकडण्यात आले होते. या घटनेतही तोच विकृत आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -