घरदेश-विदेशमध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार! आरोपी ताब्यात

मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार! आरोपी ताब्यात

Subscribe

देशात पुन्हा एकदा बलात्काराचा लाजीरवाणा प्रकार घडला आहे. मध्यप्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना मध्यप्रदेशमध्ये नुकताच एक लांछनास्पद प्रकार घडला आहे. मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. अतिशय गंभीर अवस्थेत त्या मुलीला मंदसौरहून इंदौरला हलवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात झाली असल्याचं समजतंय. जाणून घेऊया नेमकी कशी घडली ही घटना.

नेमका प्रकार काय?

मंगळवारी पिडीत मुलीचे आजोबा तिला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळी जेव्हा ते तिला आणण्यासाठी शाळेत गेले तेव्हा ती शाळेतून बेपत्ता झाल्याचे समजले. जवळपास तासभर शोध घेऊनही तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे तातडीने जवळच्या पोलीस स्थानकामध्ये ती हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली. बुधवारी मंदसौर बस स्टँडच्या पाठीमागे जवळपास ७०० मीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मण दरवाज्याजवळ ती मुलगी जखमी अवस्थेत सापडली. काट्याकुट्यांनी भरलेल्या झाडीमध्ये ही मुलगी जखमी अवस्थेत पडलेली शोधकर्त्यांनी मिळाली. त्यावेळी मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं तसंच तिच्या गळ्याभोवतीही काही खुणा आढळल्याचं लोकांनी सांगतिलं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पीडित मुलगी त्यावेळी धड बोलूही शकत नव्हती.

- Advertisement -

आरोपी गजाआड

स्थानिक पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक केली असून, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. आरोपी हा स्थानिक मंडईमध्ये हमालाचं काम करत होता. मंदसौरचे एसीपी मनोज सिंह यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना बियरच्या बाटल्या, मुलीची स्कूल बॅग, डबा आणि पाण्याची बाटली या सर्व गोष्टी आढळल्याचंही सिंह यांनी सागितलं. या घटनेमध्ये शाळेच्या बेपरवेशीरपणाची बाबही समोर आली आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरक्षा कुंपणाच्या तार उंदरांनी कुरतडल्याचं दिसतं आहे. त्यामुळे या जागेतून बाहेरची अज्ञात व्यक्ती सहज आत येऊ शकते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. बलात्कार करणारा आरोपीही मुलीला घेऊन जाण्यासाठी याच मार्गाने शाळेत घुसला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताच ठोस पुरावा समोर आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -