घरमुंबईघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ जणांचा मृत्यू

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ जणांचा मृत्यू

Subscribe

घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटल जवळच्या जीवदया लेनजवळ चार्टर्ड विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला.

घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळच्या जीवदया लेनजवळ गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सी-९० जातीचे हे विमान होते. जुहू येथून सरावासाठी ते निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे. विमानात वैमानिकासह चार जण होते. घाटकोपरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ विमान कोसळून मोठा स्फोट झाला. त्यानंतर परिसरात आगीचे मोठे लोळ पसरले. या स्फोटामुळे आसपासच्या परिसरामध्ये काहीवेळ भीतीचे वातावरण पसरले होते.

विमान पडल्यानंतर त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. घाटकोपरच्या जीवदया लेनजवळ हे विमान कोसळले. संबंधित विमान यूपी सरकारचे असल्याची माहिती समोर येत आहे. पण हे विमान उत्तर प्रदेश सरकारने यू वाय एव्हिएशन कंपनीला विकल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या घटनेनंतर सर्वोदय हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेमध्ये एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विमानातील चार जण आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या गोविंद पंडित या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये विमानातील पायलट मारिया कुबेर, कोपायलट प्रदीप राजपूत, इंजिनिअर मनिष पांडे आणि इंजिनिअर सुरभी यांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या लवकुश कुमार आणि महेश कुमार यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हे विमान दिपक कोठारे यांच्या मालकीचे होते. उत्तरप्रदेश सरकारकडे असताना देखील या विमानाला एखदा अपघात झाला होता. दरम्यान या अपघाताची चौकशी डीजीसीएची टीम करणार असल्याचे समोर आले आहे.

विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे अनेकांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर काय झाले, याचा उलगडा झाला. सांताक्रुझ विमानतळजवळ असल्यामुळे या पट्ट्यात कायमच विविध जातीच्या विमानांची आकाशातून ये जा सुरू असते. महिनाभऱ्यापूर्वीच दोन मोठ्या विमानांचा अपघात वैमानिकांच्या सावधगिरीमुळे टळला होता.

- Advertisement -

घाटकोपर दुर्घटनेसंदर्भात माय महानगरचे लाईव्ह बुलेटीन पाहण्यासाठी क्लिक करा.

हेही वाचा :
मोठा आवाज…आगीचे लोळ…आणि बरंच काही
… आणि मोठी दुर्घटना टळली
घाटकोपर दुर्घटना : असं कोसळलं चार्टर्ड विमान

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -