घरदेश-विदेशनिवडणुकीनंतर चौकीदार जेलमध्ये जाईल -राहुल गांधी

निवडणुकीनंतर चौकीदार जेलमध्ये जाईल -राहुल गांधी

Subscribe

गरिबीवर काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक

निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल आणि चौकीदार जेलमध्ये जाईल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. गरिबीवर काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलतात,कारण त्यांचे वय वाढले आहे. त्यांना त्याची आवश्यकता वाटते. माझे तसे नाही. मला तुमच्यासोबत १५ ते २० वर्षे काम करायचे आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची महाराष्ट्रात पहिली सभा नागपूरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या मतदारसंघात कस्तुचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, अंबानी कनेक्शन आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर सडकून टीका केली. अनिल अंबानींचं ४५ हजार कोटींचं कर्ज माफ करता मग शेतकर्‍यांचे कर्ज माफ का करत नाही? असा सवाल करत त्यांनी ज्या कंपनीला विमान बनवण्याचा काहीही अनुभव नाही, ज्याच्याकडे पाच पैसेसुद्धा नाहीत त्यांना मोदी सरकारने राफेलचे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशाराही राहुल यांनी दिला.

- Advertisement -

तसेच गरिबीवर काँग्रेस पक्षाचा सर्जीकल स्ट्राईक आहे. भारतातील गरीब २०% नागरिकांना म्हणजेच ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी नागरिकांच्या खात्यात वर्षाला ७२,००० रुपये जमा करणार. ही योजना आपण देशाच्या अर्थतज्ज्ञांसोबत मिळून बनविल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासन देतात, आम्ही काम करतो. 72000 रुपयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही. मी लोकांसोबत दूरपर्यंतचे संबंध बनवायला आलो आहे. मी 2-3 दिवसांसाठी राजकारण करायला आलेलो नाही. देशात प्रत्येकाला 12 हजार रुपये प्रति महिने मिळकत झालीच पाहिजे. आम्ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार. अर्जुनासारखे माझे लक्ष्य ठरले आहे. 20 टक्के गरीब लोकांना 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदींचे वय झाले ते खोटी आश्वासने देतात
नागपूर । काँग्रेसचा गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्वासने देतात. त्यांचे वय झाले आहे म्हणून ते असे करतात. माझे तसे नाही मी अजून १०-१५ वर्षे तुमच्यासोबत आहे, असे सांगतानाच काँग्रेस सत्तेत आल्यास चौकीदाराची चौकशी करून त्याला जेलमध्ये टाकू, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. नागपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ नागूपरच्या कस्तुरीपार्क येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यासभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण करणारच, असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -