घरदेश-विदेशझारखंड, छत्तीसगडमध्ये सर्वाधिक लसी वाया

झारखंड, छत्तीसगडमध्ये सर्वाधिक लसी वाया

Subscribe

केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी केली जाहीर

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र देखील बंद आहेत. अशात केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत झारखंड आणि छत्तीसगड ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लसींच्या ३७.३ टक्के लसी वाया घालवल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये एकूण लसींच्या ३०.२ टक्के लसी वाया गेल्या आहेत. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लसी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लसी वाया गेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -