घरदेश-विदेशपहिल्याच दिवशी नारायण राणे अ‍ॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांची पळापळ

पहिल्याच दिवशी नारायण राणे अ‍ॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांची पळापळ

Subscribe

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ८ जुलैला सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, कारभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी राणे अ‍ॅक्शन मोडवर दिसले. नारायण राणेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्याने चांगलीच तारंबळ उडाली. नारायण राणे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. ७ जुलैला त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

नारायण राणे यांनी ८ जुलैला मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. हा कार्यभार स्वीकारण्यासाठी राणे जेव्हा मंत्रालयात पोहोचले तेव्हा त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणेंच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? असा प्रश्न विचारला. एवढ्यावरच न थांबता राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारले गेल्या दोन वर्षात मंत्रालयाने किती रोजगार उपलब्ध केले? भेटण्यासाठी आल्यानंतर एकाही अधिकाऱ्याच्या हातात फाईल नाही? हा सगळा डेटा कोण सांगणार आहे? अशा प्रश्नांच्या फैरी राणेंनी अधिकाऱ्यांवर झाडल्या.

- Advertisement -

नारायण राणे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी अनेक अधिकारी सुट्टीवर असल्याचे कारण दिलं. जसे अधिकारी सुट्टीवरून परतील आल्यानंतर लगेच हा डेटा उपलब्ध करून दिला जाईल असं उत्तर दिलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरानंतर राणेंनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. लग्नासाठी किती कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत? राणेंच्या या प्रश्नानंतर शांतता पसरली. नारायण राणेंनी संध्याकाळपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण डेटासह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करताना चांगलं काम केलं नाही, परिस्थिती अशीच राहिली तर सर्व अधिकाऱ्यांना बदलण्यात येईल, असा इशारा दिला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -