घरदेश-विदेशमुझफ्फरपूर प्रकरण- आरोपी 'ब्रजेश ठाकूर'कडून हस्तगत ४० फोन नंबर

मुझफ्फरपूर प्रकरण- आरोपी ‘ब्रजेश ठाकूर’कडून हस्तगत ४० फोन नंबर

Subscribe

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकागृहात मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याकडून ४० मोबाईल क्रमांची यादी मिळाली आहे. या क्रमांकामध्ये काही मंत्र्यांचेही नंबर सामिल असून याक्रमांकावर ब्रजेशने सतत फोन केला होता. जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांद्वारे आयोजित केलेल्या छाप्यामध्ये हे क्रमांक हस्तगत करण्यात आले. सध्या हे क्रमांक पोलिसांकडे असून या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ठाकूरला २ जून रोजी अटक करण्यात आले होते. पोलिसांना चौकशीचा वेळ न देताच त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते.

तेजेश्वर यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विरोध पक्ष नेत्यांनी या घटनेनंतर नितीशकुमार सरकारला जवाबदार ठरवले. ७० दिवसाच्या कालावधीत तो फक्त ५ दिवसच केंद्रिय कारागृहात होता. “तब्येतीचे कारण देत ब्रजेश मेडिकल वार्ड मध्ये राहत आहे. कैद्यांसाठी बनवलेल्या वार्डमध्ये राहण्यास तो टाळाटाळ करत आहे.”- पोलीस अधिकारी

- Advertisement -

दरम्यान, शनिवारी ठाकूरच्या मुलाला सीबीआयने शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. एक दिवसाच्या चौकशी नंतर त्याला सोडण्यात आले. सीबीआयच्या चौकशी पटना न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरु आहे. बिहार सरकारने ब्रजेश याच्या एनजीओचा परवाना रद्द केला आहे. या एनजीओची मलमत्ता विकण्याऐवजी प्रशासनाने त्याचे बँक खाते बंद केले आहे. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु असून भविष्यात अनेक गोष्टी उघडकीस येतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -