घरदेश-विदेशहॉस्पिटलची सिस्टीम हॅक; बिटकॉइन मार्फत खंडणी

हॉस्पिटलची सिस्टीम हॅक; बिटकॉइन मार्फत खंडणी

Subscribe

नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलची कॉम्प्युटर सिस्टीम हॅक करुन चोरट्यांनी बिटकॉइनमार्फत खंडणी मागितली आहे.

एखाद्या कंपनीच्या वेबसाईटवरील माहिती हॅक करुन खंडणी मागण्याच्या बऱ्याच घटना आतापर्यंत घटल्या आहेत. अशाच एका घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईमध्ये घडली आहे. नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलमधील कॉम्प्युटर सिस्टीम हॅक करुन ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आली आहे. अज्ञात सायबर आरोपींनी या हॉस्पिटलच्या कॉम्प्युटर सिस्टीम हॅक करुन ती सिस्टीम सामान्य करण्यासाठी बिटकॉइनच्या मार्फत खंडणी मागितली आहे.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईच्या वाशी सेक्टर तीनमध्ये एमजीएम न्यु बॉम्बे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचे कर्मचारी रामनाथ परमेश्वर १५ जुलैला रात्री ११ वाजेच्या सुमारात कॉम्प्युटरवर काम करत होते. त्यावेळी अचानक सर्व सिस्टीम हॅक झाली. हॉस्पिटलमधून मिळालेल्या तक्रारीवर वाशी पोलिसांनी सायबर सेलला तक्रार दाखल केली. सायबर सेलचे उपायुक्त तुषार दोषी या प्रकरणी कारवाई करत आहे. ई-मेलच्या माध्यमातून वायरस कॉम्प्युटरमध्ये शिरल्याची शक्यता सायबरस सेलकडून वर्तवली जात आहे. या प्रकरणामागे इंटरनॅशनल नेटवर्कचा तर हात नाही ना? याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. कारण, हॅक करणाऱ्यांनी बिटकॉइनच्या मार्फत खंडणी मागितली आहे. सिस्टीमला हॅक केल्यामुळे हॉस्पिटलच्या कामकाजांवर मोठा परिणाम होत आहे.

- Advertisement -

बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉइन हे एक अभासी चलनाचे रुप आहे. या चलनावर कुठल्याच देशाचे नियंत्रण नाही. जगातील असंख्य लोक विनिमयासाठी बिटकॉइनचा वापर करतात. देशातील रुपयांच्या चलनावर ज्याप्रकारे रिझर्व बँकांचे किंवा सरकारचे नियंत्रणे आहे, त्याप्रकारे बिटकॉइनवर कोणाचेही नियंत्रण नाही. एका ओपन डाटाबेसवर अनेक लोक मिळून कॉम्प्युटर प्रोग्रामच्या माध्यमातून हे चलन तयार करतात. त्यावर इतरांनाही व्यवहार करण्याचे अधिकार दिले जातात. बिटकॉइन हे विशिष्ट प्रकारचे कॉम्प्युटर कोड असून प्रत्येक व्यवहारात डिजिटल सिग्नेचर जोडून बिटकॉइनची खरेदी-विक्री केली जाते. भारताच्या सुमारे वीस कंपन्या बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -